“न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा

40

‘”न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा

"न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-न्यायालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करावा अशी अपेक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत मराठी भाषेचा न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर या विषयावर विधीज्ञ ॲड श्रीराम ठोसर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश क. २ एन. के. मणेर, जिल्हा न्यायाधीश भगत, विधीज्ञ ॲड श्रीराम ठोसर, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
स्वागत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या हस्ते
विधीज्ञ ॲड श्रीराम ठोसर यांचे रोपटे देवून स्वागत केले.
ॲड श्रीराम ठोसर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना दुर्देवाने शहराकडे मराठी भाषा लयास जाताना दिसत आहे. त्यासाठी मराठी भाषा जोपासने व तीचे संवर्धन करणे हे गरजेचे आहे इतर भाषा शिकताना आपण मराठीकडे दुर्लक्ष करतो असे झाले आहे. तसेच सर्व न्यायधिश आणि वकिलांनी न्यायालयात मराठीचा जास्त वापर करावा असे सांगितले.
तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी मराठी भाषा खूप समृद्ध आहे. उच्चारांवर वाक्याचा अर्थ बदलतो, पण आपल्याकडे तीचा योग्य वापर होत नाही अशी खंत व्यक्त केली. न्यायालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश अमोल शिंदे यांनी केले.