गोरेगांव प्रेम नगर मधे फेरीवाल्यांमध्ये जागेच्या वादावरून तुफान हाणामारी.

48

गोरेगांव प्रेम नगर मधे फेरीवाल्यांमध्ये जागेच्या वादावरून तुफान हाणामारी.

गोरेगांव प्रेम नगर मधे फेरीवाल्यांमध्ये जागेच्या वादावरून तुफान हाणामारी.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞

मुंबई :- गोरेगांव प्रेम नगर पश्चिम मधे भाजी मार्केट मधल्या कांदे बटाटे फेरी- वाल्यानमध्ये जागेच्या वादावरून हाणामारी पाहायला मिळाली. दिवसेंदिवस गोरेगांव पश्चिम मधे जणू फेरीवाल्यांचे मोठ्याप्रमाणात जाळं पसरत जात आहे, त्यामध्ये अशा घटना घडणं वावगं ठरणार नाही.

त्यामध्ये गोरगांव प्रेम नगर तर पूर्ण फेरीवाला क्षेत्र घोषित होणं नाकारता येणार नाही. अक्सरष पूर्ण रस्ता फेरीवाल्यानी व्यापून जातो, तेवढीच वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग, जणू काय जत्रा भरल्या सारखं दृश्य दरोरोज पाहायला मिळते.

प्रेम नगरला आता फेरीवाला नगर नांव दिलं तर आश्चर्य होण्यासारखं काहीच वाटणार नाही. या सर्व घटनेला तिथली महापालिकाच सरस्व जवाबदार आहे. जर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने वेळ च्या वेळी जर फेरीवाल्यांवर कारवाई केली तर अशा घटना होण्याचा संबंध च निर्माण होणार नाही, पालिका जर कर्मचाऱ्यांना दररोज प्रत्येक विभागात अतिक्रमण विभागाच्या गाड्या पेट्रोलिंग ला पाठवल्या तर एकही फेरीवाला रस्त्यावर दिसणार नाही, पण तस पालिकेचे अधिकारी करणार नाही. कारण त्यांना प्रत्येक विभागातून फेरीवाल्यांकडून मिळणारे हप्ते बंद होतील. सगळा भ्रष्टाचार चालू आहे. अतिक्रमणाच्या गाड्या पालिकेतून बाहेर निघाल्या कि फेरीवाल्यांना लगेच पालिकेचेच अधिकारी फोन करून सांगतात. कि आम्ही निघालोय, लगेच फेरीवाले अलर्ट होतात, व तेवढ्या पुरतं धंदा बंद ठेवतात, गाडी निघून गेली कि परत जैसे थे असच दिनक्रम चालू राहतो.

असंच चित्र हायपर सिटी च्या मागे कॉल सेंटर च्या इथे पाहायला मिळते. तिथे फक्त आदी 1-2 फेरीवाले बघायला मिळायचे, आता बघायला गेले कि ली लिंक रोड इथून लाईन लागते ती अगदी संपायला बॅक रोड पर्यंत जाते, एवढी पब्लिक त्या रोड ला जमा होते कि कुठलातरी उत्सव चालू आहे. अशा पद्धतीने महापालिकेच्या वरध हस्तीने फेरीवाल्यांचे जाळे पसरत आहे. याला जवाबदार महापालिकाच आहे.

हप्त्यातून एकच वेळ जर अतिक्रमण ची गाडी फिरली ती पण सगळ्यांना कळवून तर फेरीवाले कसे कमी होणार, पण जनतेला एक गोष्ट कळत नाही कि, पालिकेचे अतिक्रण विभागाचे कर्मचारी हप्त्यानी च ड्युटीवर येतात काय, जर रोज येत असतील तर त्यांना पालिकेत खुर्ची गरम करायला ठेवतात काय, का रोज पाठवत नाही गाड्या घेऊन, जनतेच्या मनातला हा मोठा प्रश्न आहे. काय कारण आहे, कर्मचारी कमी आहेत कि त्यांना पगार द्यायला पालिकेकडं पैसे नाहीत, का त्यांना तिथेच बसून ठेवतात. कारण द्यायला पाहिजे पालिकेने. जर असंच चालू राहिलं तर फेरीवाला मुक्त मुंबई भविष्यात कधीच होणार नाही. महापालिकेला एवढे अधिकार असून सुद्धा अशा घटना रोज घडत आहेत, पालिकेला कुणाचा दबाव आहे का, असा प्रश्न नेहमी मनात येतो.

सदर घटना स्थळी पोलीस व पालिकेचे अतिक्रमण विभागाच्या गाड्या येऊन त्या फेरीवाल्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही साठी पोलीस घेऊन गेले, व तात्पुरतं पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्याना बंद केले, परंतु ते गेल्या नंतर फेरीवाल्यांचे धंदे परत चालू झालेले पाहवयास मिळाले. सदर गोरेगांव प्रेम नगरचे फेरीवाले येत्या हप्त्यात जर महापालिकेने कायम स्वरूपी हटवले नाही तर स्थानिक पत्रकार या नात्याने सखोल चौकशी करून सर्व पुराव्या सहित, महापालिकेचे मुख्य आयुक्त श्री. गगराणी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेबांना लेखी स्वरूपात तक्रार देण्यात येईल.