म्हसळा नगरपंचायत डंपिंग ग्राऊंड विषय पेटला… डंपिंग ग्राऊंड मध्ये दडलय काय…!
दर वर्षी कचरा विलीनीकरण करण्यासाठी येणारा निधी जातो कुठे म्हसळा मनसे तालुका अध्यक्ष यांचा प्रशासनाला थेट प्रश्न
विविध विषयांवर म्हसळा मनसे आक्रमक .. नगरपंचायतला दिला आंदोलनाचा ईशारा
✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:२५ फेब्रु रोजी म्हसळा शहरातील डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीमुळे म्हसळा शहरातील राजकीय वातावरण गरम होऊ लागल्याने काही राजकीय संघटना आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत, त्यातच ही आग लागली नाही लावण्यात आली आहे असे काही नागरिकांचे म्हणणे आहे, आगीमुळे शहरातील वातावरण दुषीत होऊन नागरीकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, म्हसळा मनसे तालुका अध्यक्ष यांच्या वतीने म्हसळा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना या विषयाला धरून निवेदन देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, डंपिंग ग्राऊंडला आग कशी लागली, कचरा विलीनीकरण करण्या अगोदरच कशी आग लागते, दर वर्षी कचरा विलीनीकरण करण्यासाठी येणारा निधी याचे काय होते, भंगार मधुन मिळणारा पैसा कुठे जातो, कचरा विलीनीकरण शेड अर्धवट असताना अनधिकृत कचरा गोळा करणे, कचरा ठेकेदार याची मुदत संपली असताना परत त्याच ठेकेदाराला सहा महिने मुदत वाढवून देण्यात येते व परत निविदा काढण्यात आली असे का, कचरा वाहतूक करण्यासाठी तिन चाकी दोन वाहने मागविण्यात आली होती ती वाहने व कचरा विलीनीकरण यंत्रणा हिंदू स्मशानभूमीत धुळ खात पडली आहे व वाहनांची पासिंग पण झालेली नाहीत असे का.., अशा विविध विषयांवर नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली . समाधानकारक उत्तरे मिळाली नाही तर पुढील काही दिवसात जनतेला घेऊन आंदोलन करणार म्हसळा तालुका अध्यक्ष यांनी नगरपंचायतला स्पष्ट ईशारा दिला आहे.
—————————————-
म्हसळा नगरपंचायत सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे, कचरा विलीनीकरण करण्यासाठी दर वर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो आणि त्या अगोदर डंपिंग ग्राऊंडला आग लावण्यात येते, आग विझविण्यासाठी जनतेच्याच पैशाचा वापर केला जातो, आगीमुळे शहरातील नागरीकांना व खास करून लहान मुलांना अतिशय त्रास सहन करावा लागला आहे, धुरा मुळे वातावरण दुषीत होऊन श्ववसनाचे आजार वाढु लागले, याला जबाबदार कोण, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, समाधानकारक उत्तर नाही मिळाले तर नगरपंचायत विरोधात
आंदोलनाचा ईशारा दिला आहे
सौरभ गोरेगावकर
मनसे म्हसळा तालुका अध्यक्ष
—————————————
डंपिंग ग्राऊंडला आग लागली असल्याने वातावरणात प्रदुषण निर्माण झाले आहे, या साठी डंपिंग ग्राऊंड वर तात्पुरते स्वरूपात उपाययोजना करण्यात येणार असून संबंधित ठेकेदार याची रितसर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, व डंपिंग ग्राऊंडचा विषय लवकरच मार्गी लावण्यात येईल व यापुढे नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल .
विठ्ठल राठोड
मुख्याधिकारी, नगरपंचायत म्हसळा.