मानवी आहारातील पोषकता वाढविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाचणी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी–मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव
✍️किशोर पितळे ✍️
तला तालुका प्रतिनिधी
📞 ९०२८५५८५२९📞
तळा :-मानवी आहारातील पोषक तत्वाच्या कमतरतेने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारातवापर वाढविण्याचाअभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे . त्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाचणी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी-असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी केले आहे.तालुका कृषीअधिकारी तळा व प्रिझम सामाजीक विकास संस्थाअलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन २०२३-२४ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत असून उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्त्व पटवून देण्याकरिता”पोषण तृणधान्याचाआहार हाच निरोगी जीवनाचा आधार” या पथनाट्यातून तळा बस स्थानक,बळीचा नाका या गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यातआली.पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिकतृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे.यामध्ये व्याख्याने,रॅली, महिला बचतगटांचेशिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा,वकृत्व स्पर्धा,चित्रकला, भाषण इ.स्पर्धा व जनजागृतीपर कार्यक्रम तळा कृषी विभागाकडून राबविण्यात येत असल्याचे मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनीसांगितले. जंकफुडचा अवास्तव आहारात वापर वाढल्याचे वास्तववादी चित्र आपल्या समोर आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणाअसेविकार वाढत आहेत.म्हणूनच कोरोनानंतर आरोग्य विषयक सजगता वाढून नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्याची मागणी वाढल्याचा अहवाल आहे.या संधीचा फायदा घेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाचणी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी,कृषी सहाय्यक दिनेश चांदोरकर,अतुल बाबर, सुमित पुरी, संदीप साळुंके, योगेश कोळी,प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व पथनाट्यातील कलाकार प्रतिक कोळी,नेहा पाटील, हर्षदा भगत,अश्विनी पारधी,नेहा जावसेन, स्नेहा मानकर, कविता हिंदोळे उपस्थित होते.