अबब ! गाडी कुणाची आणि चालन कुणाला
हाईवे ट्राफिक पोलिसांचे अनागोदी अजब भोगड़ कारभार
अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही: – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील घटना. सिंदेवाही लोणवाही मधील वेक्तीला आलेली चालान हि चिखलगाव फाट्यावर ट्राफिक पोलिसांनी चालत्या गाडीत काढली असून त्या गाडीचे मालक हे दुसरे असताना व नंबर प्लेट सुधा दुसरी असताना मोबाइल मशीन च्या साह्याने आजकाल चालत्या गाडी वाल्याना चालन करीत असल्याने मोठे घोड आता समोर येताना दिसत आहे. अश्यातच एक घटना या दोन दिवसाच्या अगोदर झाली असून चक्क गाडी दुसऱ्याची आणि 500 रु चा ऑनलाईन चालान दुसऱ्यानेच आल्याने त्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फोटो उपलोड मध्ये चालान च्या shine (होंडा )गाडी असून दोन युवक ती गाडी चालवीत आहे. तसेच नम्बर प्लेट चा नम्बर हा दुसरा असताना सुधा तो त्यांना चालान जाण्याऐवजी ज्यांच्या कडे ऍक्टिवा गाडी आहे व नम्बर प्लेट दुसरा आहे अश्या महिलांच्या नावाने चालान ऑनलाईन गेल्याने त्या महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असेच काम ट्राफिक पोलिसांचे राहल्यास अनेक लोकांना याचे भुर्दड सोसावे लागणार हे निश्चित. त्यामुळे आता तरी जे चंद्रपूर वरून येणारे ट्राफिक पोलीस आहेत त्यांनी प्रत्यक्षतः चौकशी करूनच चालान ऑनलाईन फाडावी असे लोकांचे मत आहे. जेणेकरून या सर्व गोष्टीचा मनस्ताप सर्वसाधारण लोकांना सोसावे लागणार नाही. धावत्या गाडीचा फोटो काढल्याने नम्बर एक चुकल्याने ज्या गाडी मालकाला चालान जायला पाहिजे त्याला नं जाता दुसऱ्याच वेक्तीला गेला असल्याने चुकीच्या निर्णयाला अनेक लोक त्रासलेले आहेत.असेच प्रकार अनेक लोकांसोबत झाले असून भीती पोटी कोणीही समोर होऊन बोलायला तयार नसल्याचे पण आढळून येत आहे. यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत योग्य ती कारवाही करावी अशी मागणी त्या नागरिकांकडून होत आहे.