विवाहितेवर मारहाण करून लैंगिक अत्याचार.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
उमरेड :- ( नांद.) सासऱ्या सोबत शेतातून घरी परत येत असलेली विवाहित महिला मध्येच पाणी घेण्यासाठी पाटसरी जवळ थांबली आणि नराधमाने तिला पकडले. शरीर संबंध प्रस्थापित करण्यास नकार देताच त्याने तिला बेदम मारहाण करून जखमी केले. आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना भिवापूर पोलीस ठाणे हद्दीतील नांद, लोणार शिवारात मंगळवारी (दि.27) सायंकाळी घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. कृष्णा श्रीराम नांदुरकर (42. रा.नांद ता. भिवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दोघेही एकाच मोहल्यात राहत असल्याने एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तिचे पती आजारी असल्याचे त्याला माहित होते. ती मंगळवारी सायंकाळी ती घरी जायला ससऱ्या सोबत निघाली होती तिचा सासरा पुढे गेल्याचे लक्षात येताच कृष्णाने तिला वाटेत अडविले आणि शरीर सुखाची मागणी केली. तिने स्पष्ट नकार देतात त्याने तिला काठीने बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्धे पडली. त्यातच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर येताच त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. काही वेळाने सासरा लंगडत तिच्याजवळ आला. घरी आल्यावर तिने संपूर्ण प्रकार धामणगाव येथील तिच्या भावाला सांगितला आणि बुधवारी सकाळी नांद देतील पोलीस चौकी गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी भिवापूर पोलीस भांडवी ३७६ ,३४१ ,३२४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.