ग्रामपंचायत पुरार येथे जगद्गुरू संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात सजरी करण्यात आली

75
ग्रामपंचायत पुरार येथे जगद्गुरू संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात सजरी करण्यात आली

ग्रामपंचायत पुरार येथे जगद्गुरू संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात सजरी करण्यात आली

ग्रामपंचायत पुरार येथे जगद्गुरू संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात सजरी करण्यात आली

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०.

पुरार- रायगड :- रोहिदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते. रोहिदासांच्याच भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.असे थोर संत शोरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती प्रथमतः ग्रुप ग्रामपंचायत पुरार येथे साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत पुरार सरपंच सौ.राहिला हुर्जुक यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्याच बरोबर .ग्रा. पुरार उपसरपंच सौ.संजना साबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व ग्रा.पू. ग्रामसेविका सौ.उषा पालवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण केले.

संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची प्रतिमा असलेले फ्रेम ऍडव्होकेट तुषार बिरवाडकर यांच्या वतीने ग्रा.पुरार येथे भेट स्वरूपात देण्यात आली.

श्री. विलास गोरेगावकर यांनी संत रोहिदास जयंती निमित्त संत रोहिदास महाराज यांच्या जीवनावर सर्व समाज्याला मार्गदर्शन केले. तसेच थोर महिला यांची जन्म तारिख आठवण करून देत त्यांची सुद्धा ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी करावी अशी विनंती केली.

ग्रामपंचायत पुरार येथे प्रथम वर्षी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी केल्या बद्दल सर्व चर्मकार समाज बांधव माता भगिनी यांनी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच ग्रामसेविका व कर्मचाऱ्यांनचे विशेष आभार मानले व भविष्यात कायमस्वरूपी अशाच प्रकारे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी असे आव्हान करण्यात आले.