CBSE: पेपरची व्हॉट्सअपवर ३५ हजारांत विक्री

55

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या १० वीच्या गणित आणि १२ वीच्या अर्थशास्त्र पेपरची व्हॉट्सअॅपवर विक्री झाली असून यासाठी विद्यार्थ्यांनी एक हजार ते ३५ हजार रुपये मोजले.
व्हॉट्सअॅपवर लीक झाल्यानंतर सीबीएसई पेपरची किंमत १ हजार ते ३५ हजारपर्यंत गेली होती. याप्रकरणी दिल्लीमधील कोचिंग इंस्टिट्यट चालवणाऱ्या विक्की नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सीबीएसई पेपर व्हॉट्सअॅपवर लीक झाल्यानंतर हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका विद्यार्थ्याने व्हॉट्सअॅपवरच्या पेपरसाठी ३५ हजार रुपये मोजले परंतु त्यानं नंतर पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०-१० हजार रुपयांना विकले. ज्या विद्यार्थ्यांनी १० हजार रुपयांत पेपर विकत घेतला त्या विद्यार्थ्यांनी पुढे ५-५ हजार रुपयांत फॉरवर्ड केले. ५ हजारात खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांना एक-एक हजार रुपयांत पेपर विकले. मोबाईलवरून फॉरवर्ड करण्यात आल्याने काही तासाच्या आत हा पेपर अनेक विद्यार्थी, शिक्षकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचला. १२वीचा अर्थशास्त्रचा पेपर व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पेपरसाठी पैसे मोजले असल्याने ते पैसे वसूल करण्यासाठी हा मेसेज अन्य विद्यार्थ्यांना फॉरवर्ड केल्याचे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.