बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव वचनबद्ध : आ. सुधीर मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारानेविसापूर कोलगाव रस्त्यावर वर्धा नदीवर बांधला जातोय मोठा पूल
केंद्रीय मार्ग निधीतून 56.56 कोटी रू निधी मंजूर, भूमिपूजन संपन्न
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- 1996 मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून विसापूर गावातील सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी 1 कोटी रू निधी मंजूर केला तेव्हापासून या गावाच्या विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. या गावातील नागरिकांना मी विकासाबाबत जो शब्द दिला तो प्राधान्याने पूर्ण केला. या गावातील नागरिकांनी सुद्धा माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले. त्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर मी या गावाच्या विकासासाठी शर्थीचे प्रयत्न केले व नेहमी करेन. विसापूरसह बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. 27 मार्च रोजी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर या गावात विसापूर कोलगाव रस्त्यावरील वर्धा नदीवर बांधण्यात येणाऱ्या मोठया पुलाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संध्या गुरनुले होत्या. कार्यक्रमाला भाजपाचे बल्लारपूर तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार, जिल्हा परिषद सदस्य हरीश गेडाम, सरपंच, उपसरपंच, विद्या देवाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री मुत्यालवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, विसापूर येथील नागरिकांनी या पुलाच्या बांधकामाची मागणी माझ्याकडे केली होती. मी नागरिकांना दिलेल्या शब्दानुसार प्रयत्न सुरू केले. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची विनंती केली .नेहमीप्रमाणे नितीनजींनी माझी विनंती मान्य करत या पुलासाठी 56.56 कोटी रू निधी मंजूर केला व आज हा पूल साकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या आधीही विसापूर या गावात देशातील सर्वाधिक सुंदर बोटॅनिकल गार्डन, भिवकुंड येथे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह विन इमारतीचे बांधकाम, पठाणपुरा माना नांदगांव विसापूर रस्त्यावरील विसापूर गावातीलभागात रस्त्यांचे सिमेंटिकरण, सैनिकी विद्यालयाची निर्मीती, तालुका स्टेडीयमचे बांधकाम, विसापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, विसापूर येथे २५ ठिकाणी बोअरींगज , बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर रेल्वेचा थांबा, बल्लारशाह ते वर्धा तसेच बल्लारशाह से काजीपेठ नागपूर पॅसेंजरचा थांबा, रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्मची उंची वाढविणे, विसापूर येथे दोन व्यायामशाळेची बांधकामे, संत रविदास महाराज सभागृहाचे बांधकाम, पाण्याच्या टाकीजवळ हनुमान मंदीराला लागून सभागृहाचे बांधकाम, विसापूर ते नांदगांव रस्त्याचे डांबरीकरण , विसापूर नांदगांव रस्त्यावर मोठया पुलाचे बांधकाम, भिवकुंड येथे साखळी बंधा-याचे बांधकाम, गावात विविध सामाजीक सभागृहांची बांधकामे, ६७० एलपीजी गॅस कनेक्शन्सचे वितरण, विसापूर नांदगांव येथील नागरिकांना अन्नधान्य सुरक्षा अंतर्गत 100 टक्के नागरिकांना धान्य वाटप, विसापूर गावात पाणी पुरवठा योजना अशी विकासकामांची दीर्घ मालिका मी लोकप्रतिनिधी म्हणून निर्माण करू शकलो. हे सर्व केवळ विसापूर वासीयांच्या प्रेमाच्या व आशीर्वादा मुळेच शक्य झाले असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
भूमिपूजन झालेला हा मोठा पुल कोलगाव नांदगांव, सास्ती व विसापुर हया प्रमुख गावांना जोडत असुन यामुळे सास्ती मार्गे जाणा-या वाहतुकीस दिलासा मिळून हे अंतर 10 किमी ने कमी होणार आहे. या पुलामुळे कोलगांव, सास्ती, नांदगांव व विसापुर येथील अंदाजे 24 हजार नागरिकांना फायदा होणार आहे. या मोठया पुलाची लांबी 360 मीटर असून पुलाच्या दोन्ही बाजुचे पोचमार्ग 3.50 किमी लांबीच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याद्वारे जोडण्यात येणार आहे असेही आ मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संध्या गुरनुले, किशोर पंदिलवार यांचीही भाषणे झाली. आम्ही विकासाबाबत मागणी करायची आणि सुधीरभाऊनी ती पूर्ण करायची असे समीकरण गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ निर्माण झाले आहे. विकासाप्रति तळमळ असलेला असा लोकनेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य असल्याचे किशोर पंदिलवार म्हणाले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निकषांचे पालन करत व सोशल डिस्टंसिंग पाळत कार्यक्रम संपन्न झाला.