वडनेर ग्रामपंचायत मध्ये होणा-या गैरव्यवहाराची चौकशी करा- गुरूदयालसिंग जुनी

43

वडनेर ग्रामपंचायत मध्ये होणा-या गैरव्यवहाराची चौकशी करा- गुरूदयालसिंग जुनी.

वडनेर ग्रामपंचायत मध्ये होणा-या गैरव्यवहाराची चौकशी करा- गुरूदयालसिंग जुनी

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि 29 मार्च :- तालुक्यातील मोठ्या लोकसंख्या असलेल्या पैकी एक गाव वडनेर या ग्रामपंचायतचे सदस्य गुरूदयालसिग जुनी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन मार्फत मिळणा-या निधी मध्ये वडनेर ग्रामपंचायत चे सचिव हरीदास विठोबाजी रामटेके यांनी वडनेर येथील ग्रामस्थ बळवंत फाटे ह्या स्वच्छ भारत मिशनचा लाभार्थी असून फाटे यांनी आपले स्वच्छता गृहाचे काम सुरु करण्याआधीच उपसरपंच सुभाष शिंदे ह्याला सचिव रामटेके यांनी नगद वटण्याचा धनादेश देत फाटे यांचे अनुदान परस्पर उपसरपंच सुभाष शिंदे यांनी खोटी सही मारुन डकारुन घेतले. बळवंता सुधाकर फाटे यांचे नावाने असलेला धनादेश वडनेर ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष शिंदे यांचे देण्याचा का संबंध असावा आणि तोहि नगद ताबडतोड वटण्याचा धनादेश हा वडनेर ग्रामपंचायत सचिव हरिदास रामटेके यांनी कां दिला. जो नियमानुसार लाभान्वित व्यक्तिचे नावे बँक खातेमध्ये जमा होणारा धनादेश देणे बंधनकारक असतांना रोख धनादेश देत, दिनांक २३ सप्टेंबर २०२० मध्ये बळवंता सुधाकर फाटे यांचे संडास चे बांधकाम नसतांनाही हा रोख धनादेश उपसरपंच शिंदे यांनी ४२० करुन खोट्या स्वाक्षरीने रोख रक्कमेवर हाथ साफ करुन वडनेर ग्रामपंचायत भ्रष्टाचारात किती लिप्त आहे ह्या प्रकरणावरुन लक्षात येते. फाटे यांचे संडास चे बांधकाम चालू नसतांनाही त्यांचे नाव स्वच्छता अभियानाचे संडास पुर्ण झाले या यादीमध्ये कसे काय आले हा वडनेर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सचिव या त्रिकुटाने कसा कट रचला हा भ्रष्टाचाराचा यज्ञ प्रश्न आहे. लाभार्थी बळवंता फाटे यांचे संडासचे बांधकाम १० फरवरी २०२१ ला सुरू करण्यात आले असता उपसरपंच सुभाष शिंदे यांनी ४२० करीत आपल्या पदाचा गैरवापर दबाबी राजकारण आणि सचिव रामटेके यांनी सुध्दा ह्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे दाखवू दिले आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानाचे असे परस्पर १२०००/- रु. फाटे यांचे अनुदान लाटण्याचे ग्रामस्थामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ह्या भ्रष्टाचाराची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालसिंग जुनी यांनी हिंगणघाट गट विकास अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,वर्धा यांना सकोल चौकशी करुन दोषी असणाऱ्या सर्वे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच व सचिव यासह ग्रामपंचायत वडनेरच्या भोंगळ कारभाराची कायद्याने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अनेकांनी दोन वर्षापासून संडास बांधकाम केले आहेत त्या लाभार्थींना अजूनही धनादेश मिळाले नाही.तेव्हां त्याही लाभान्वित ग्रामस्थाचे परस्पर धनादेश तर रोखेने काढले नाही ही शंका जुनी यांनी आमचे प्रतिनिधि जवळ बोलून दाखविली, जर ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही तर लवकरात लवकर गुरूदयालसिंग सोरनसिंग जुनी, व विनोद येळणे , व अजय ढोक ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसणार आहे असे भ्रष्टाचार मध्ये आणखी किती पद्धती अधिकारी आहे याची पण चौकशी करा.