मीडिया वार्ताचे नागपूर प्रतिनिधी प्रणय सोहमप्रभा यांना साहित्य क्षेत्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर

प्रणय सोहमप्रभा
२७ मार्च, नागपूर: जागतिक आंबेडकरवादी महामंडळ साहित्य संमेलनाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त दिक्षाभूमी येथील सभागृहात पुरस्कार वितरण व प्रकाशन सोहळा थाटात पार पडला.समारंभचे प्रमुख अतिथी नागार्जुन सुरई ससाई यांनी म्हटले की आज संपूर्ण जगाला बौध्द विचारांची, आंबेडकर विचारांची नितांत गरज आहे.समारंभचे उदघाटक प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांचे साहित्य हे संशोधनत्मक होते. त्यांच्या साहित्यातून सामाजिक परिवर्तन शक्य असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आंबेडकर साहित्यिकांनी संशोधनत्मक साहित्यावर भर द्यावा. सोबतच ते असे म्हणाले की जर मेंदूला सुदृढ ठेवायचे असेल तर आंबेडकरी साहित्य वाचण्याची गरज आहे.
हे आपण वाचलंत का?
- महाराष्ट्रातील आयएनएस शिवाजी नौदल तळ देशात सर्वोत्तम
- अधिकाऱ्यांच्या संगनमताने सागझाडाची अवैध वृक्षतोड
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
“दुसरे आंबेडकरी साहित्य संमेलन मलेशिया येथे होणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिपककुमार खोब्रागडे यांनी सांगितले.माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, सुजित मुरमाडे, शंकर बरडे, डॉ.सुरेश घरडे,डॉ. सुमा रोडनवर, डॉ. रवींद्र तिरपुडे, डॉ. गोविंद कांबळे आदी मान्यवर मंचवार उपस्थित होते. यावेळी १५० साहित्यिकांना वेगवेगळे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी केले तर संचालन डॉ. वीणा राऊत यांनी केले