” मौजा देव्हाडी बुज.येथे साईनाथ मंदीराचे सभामंडप व बांधकामाचे भूमिपूजन कार्य संपन्न “
✍भवन लिल्हारे ✍*
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मौजा देव्हाडी बुज. येथे दिनांक २८ मार्च २०२२ रोजी तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार मा.श्री. राजु मानिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते साईनाथ मंदीर देव्हाडी बुज. येथे सभामंडप बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. साई मंदीर येथे पुजा अर्चना करून भुमीपुजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी आमदार राजुभाऊ माणिकराव कारेमोरे यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा स्वागत करण्यात आला. व देव्हाडी येथील घरकुल उपोषण आंदोलन मध्ये उपोषणावर बसलेल्या महिलेला आमदार साहेब यांनी भेट देऊन त्या महिलेला निंबु शरबद पाजुन उपोषण सोडविले व आश्वासन दिले की लवकरात लवकर घरकुलाचे समस्या सोडविण्यात येतील, व आमदार साहेब यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, समस्या ही सारे जनतेची आहे. लवकरात लवकर सोडविण्यात यावी असे निर्देश दिले. त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, व देव्हाडी ग्रामवासी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.