एकट्या भंडारा जिल्ह्याला डीबीटीसाठी हवे २७५ कोटी रुपये

एकट्या भंडारा जिल्ह्याला डीबीटीसाठी हवे २७५ कोटी रुपये

एकट्या भंडारा जिल्ह्याला डीबीटीसाठी हवे २७५ कोटी रुपये

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838

भंडारा :- महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांचे बोनस नाकारून आता बोनस ऐवजी डीबीटी ( डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ) अंतर्गत निधी देण्याची तयारी चालवीली आहे. मात्र अद्यापही डीबीटीच्या माध्यमातून नेमकी किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार याबाबतीत स्पष्टता नाही. बोनसच्या धरतीवर डीबीटी रक्कम द्यावयाची झाल्यास एकट्या भंडारा जिल्ह्यासाठी २७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आधारभूत खरेदी योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख ६ हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.१ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकन्यांना प्रति क्विंटल १९४० रुपये दिले जान आहे.२०१५-१६ पासुन शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून बोनस दिला जातो, गतवर्षी ७०० रुपये बोनस शेतकऱ्याला देण्यात आला होता. त्यामुळे यंदाही धरणे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शेतकऱ्यांना यंदाही बोनस मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा राज्य शरकारने फेटाळली. व बोनस ऐवजी आता डीबीटी निधी देण्याची तयारी चालवीण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. या कारणाने आता राज्य सरकारवरचा विस्वास शेतकऱ्यांनी तोडला आहे. यामुळने आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंतेचा प्रश्न उद्भवला आहे.