” मौजा हरदोली ( झं.) येथील सरपंच मा.श्री. सदाशिव भाऊ ढेंगे यांना महाराष्ट्र गौरव २०२२ या पुरस्काराने केले सम्मानित “
✍ भवन लिल्हारे ✍
!! भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी !!
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
मोहाडी :- विदर्भातील भंडारा जिल्हा, मोहाडी तालुक्यातील मौजा हरदोली ( झं.) येथील समाजाचे हित ठेऊन सामाजिक कार्य करणारे झुंझारू तडफदार सरपंच मा. सदाशिव भाऊ ढेंगे यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन ” महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था नागपूरच्या वतीने दिनांक २८ मार्च २०२२ रोज सोमवारला सर्वोदय आश्रम नागपूर येथे ” महाराष्ट्र गौरव पुरस्काराने ” सम्मानित करण्यात आले.
या वर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार ‘ महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर च्या वतीने १५ वर्षांच्या काळातील सामाजिक कार्याची दखल घेत कोरोना काळातील मदतीचा हात, आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या उपक्रमाची दखल घेत आदर्श सरपंच सदाशिव ढेंगे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण मा. जयंत पाठक ( रिजनल डायरेक्टर ऑल इंडिया इन्स्टिट्युट नागपूर ) मा. सौ.निशा नगरारे ( सहाय्यक आयुक्त कामगार नागपूर ) मा. दत्ता शिर्के ( अध्यक्ष जनसंघर्ष समिती गडचिरोली ) मा. सुनिल वर्मा, समाज सेविका मा.सौ. शितल पाटील संस्थापिका महिमा सामाजिक संस्था नागपूर, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला. सदर महाराष्ट्र गौरव पुरस्कारात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र राज्यातील समाज सेवकाचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे श्रेय सदाशिव भाऊ ढेंगे यांनी हरदोली झं. ग्रामवासी, मित्र मंडळ मोहाडी, तुमसर, भंडारा यांना दिले. पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. बंडू आंबटकर अमरावती, मा. रामनाथ बोराडे संगमनेर, मा. पुरुषोत्तम घोघरे खीरगव्हान, मा. विक्रांत इंगळे नागपूर, मा. सौ कल्याणी भुरे तुमसर, मा. दिलीप बिसेन सोनेगाव, डॉ. सूर्यप्रकाश गभने वडसा, मा. किशोर रंगारी भंडारा, मा. विशाल शेंडे, ड्रा. मिनल पालेकर, मा. राहुल निमजे, मा. छगन बिल्लोरे नागपूर, मा. प्रल्हाद किंमतकर कोदामेढी, मा. निलकंठ पुडके भंडारा, कैलास मते काटी, मा भवनभाऊ लिल्हारे मीडिया वार्ता न्युज पत्रकार आदींनी मा. सदाशिव भाऊ ढेंगे यांचा अभिनंदन केले