पावसाचे पाणी पूनरसंकलन व वापर (catch the rain)मोहिमेची गडचिरोली तालुक्यातून सुरुवात.
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
गडचिरोली,(जिमाका) दि.29: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुमार आशीर्वाद (भारतीय प्रशसकीय सेवा),यांनी ग्राम पंचायत कण्हेरी पंचायत समिती गडचिरोली येथे भेट देऊन पावसाचे पाणी संकलन व वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) चे काम पाहणी केली व पावसाचे पाणी पूनरसंकलन व वापर (catch the rain)मोहिमेची गडचिरोली तालुक्यातून सुरुवात केली.सदर मोहीम ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने 29 मार्च 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष कमी करून पाण्याची शाश्वत उपलब्धता करण्यासाठी सुरू केली आहे. योजनेत भूजल पातळी व पृष्ठीय पाण्याची पातळी वाढवण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग ,75 नवीन अमृत तलावांची निर्मिती,अस्तित्वातील जल साठ्यांचे खोलीकरण व दुरुस्ती,सार्वजनिक तसेच वैयक्तिक शोषखड्डे बांधकाम, वृक्ष लागवड, रिचार्ज पिट, पाणलोट विकास कामे,तसेच इतर अनुषंगिक कामे घ्यायची आहे. ग्राम पंचायत कण्हेरी येथील इमारतीला 15 वा वित्त आयोग सन 2020-21 मधील बंधित निधीतून सदर काम घेण्यात आले आहे.पावसाचे पडणारे पाणी पाईप द्वारे एकत्र करून त्यांना शोष खड्ड्यांमध्ये मुरवून त्याद्वारे भूजल पातळीत वाढ करणे हा या कामाचा उद्देश आहे. केलेल्या कामाचे अंदाजपत्रक व प्रत्यक्ष केलेले काम पाहून त्यांनी कामाचे एकंदर स्वरूप समजून घेतले.या प्रसंगी श्री.आशीर्वाद यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सर्व शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग चे काम लवकरच सुरू करीत असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी ग्राम पंचायत कण्हेरी येथील आरोग्य उपकेंद्र,अंगणवाडी कार्यालय तसेच उच्च प्राथमिक शाळा यांच्या इमारतींची पाहणी करून रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे घेण्यासाठी अंदाजित खर्च व संभावित अडचणींची माहिती घेतली.तसेच ही कामे रोजगार हमी मधून पुढील आर्थिक वर्षा पासून सुरू करण्याचे निर्देश गट विकास अधिकारी यांना दिले.
यावेळ श्री. अमित तुरकर, उप अभियता ग्रामीण पाणपुरवठा विभाग, श्री. चेतन हिवंज, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत विभाग, श्री. मुकेश माहोर संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरोली,श्री. तात्याजी मडावी,सरपंच ग्राम पंचायत कण्हेरी,ग्राम पंचायत सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.