नांदेड जिल्ह्यातील पाच गावे थकबाकीमुक्त

नांदेड जिल्ह्यातील पाच गावे थकबाकीमुक्त

नांदेड जिल्ह्यातील पाच गावे थकबाकीमुक्त

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391

नांदेड : -वीजबीलांच्या थकबाकी वसुलीसाठी रणरणत्या उन्हातही ग्राहकाभिमूख सेवा देत घरोघरी जावून राबविलेल्या हरघर दस्तक मोहिमेची फलश्रृती दिसून येत आहे. जिल्हयातील पाच गावांनी वीजबिलांची थकबाकी शुन्यावर आणली आहे. विहीत वेळेच्या आत गावे थकबाकीमुक्त झाल्यामुळे मथकबाकीमुक्त झालेल्या गावांना वीजसेवा देणा-या जनमित्रांचे कौतूक मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

गावकरी ते राव ना करी हा वाक्यप्रचार तंतोतंत खरा करून दाखविण्याची किमया वडाची वाडी, दुधड, तलहारी, तलहारी तांडा आणि सेवादास तांडा येथील ग्रामस्थांनी करून दाखवली आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून राबविण्या आलेल्या हरघर दस्तक या माहिमेअंतर्गत थकबाकीदार वीजग्राहकांच्या घरोघरी जावून महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-यांनी थकबाकीमुक्त करण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.

महावितरणच्या सरसम शाखा कार्यालयांतर्गत येणा-या वडाची वाडी आणि दुधड या गावाचा वीजपुरवठा अखंडीत ठेवणारे जनमित्र साईनाथ कल्याणकर यांनी ग्राहकाभिमूख दिलेल्या सेवेमुळेच आदीवासी बहूल असलेल्या वडाचीवाडी गावातील ४८ वीजग्राहकांकडे असलेली ३२ हजार ३०० रूपयाची थकबाकी तसेच दुधड येथील २४९ वीजग्राहकांनी १ लाख २५ हजार ६३० रूपयांची थकबाकी भरत संपुर्ण गाव थकबाकीमुक्त केले आहे. जनमित्र साईनाथ कल्याणकर यांनी वेळोवेळी वीजग्राहकांच्या हाकेला दिलेल्या प्रतिसादामुळेच ग�