किन्नरांसाठींचा नांदेड पॅटर्न पथदर्शी ठरेल; अशोक चव्हाण

किन्नरांसाठींचा नांदेड पॅटर्न पथदर्शी ठरेल; अशोक चव्हाण

किन्नरांसाठींचा नांदेड पॅटर्न पथदर्शी ठरेल; अशोक चव्हाण

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

नांदेड : – भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हमी दिली आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. २८) व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्‍घाटन व या इमारतीत किन्नरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राबाबत प्रमाणपत्राचे हस्तांतरण, जिल्ह्यातील ३४ किन्नरांना मतदान ओळखपत्राचे वाटप पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण इमारतीत करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी उपस्थित होते.