राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासाचे व्यासपीठ- मा. धर्मरावबाबा आत्राम

राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासाचे व्यासपीठ- मा. धर्मरावबाबा आत्राम

राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्वाच्या सर्वांगिण विकासाचे व्यासपीठ- मा. धर्मरावबाबा आत्राम

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

*एटापल्ली* : राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिव निर्माण करून राष्ट्रहित व समाजहित जोपासण्याचे कार्य करते. स्थानिक परिसर आदिवासी भाग असल्याने निरक्षरता, अंधश्रध्देचे प्रमाण अधिक आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर हे उत्कृष्ठ समाज निर्मीतीचे साधन आहे. रासेयो विद्यार्थ्यांमध्ये असणारे सूप्त व नेतृत्वगुण विकसित करीत असते तसेच ग्रामीण भागातील सामाजिक, राजकिय व सांस्कृतिक माध्यमातून जनजागृती करणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात मा. धर्मरावबाबा आत्राम आमदार तथा सचिव, भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी यांनी केले.

भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथील रासेयो विभागाअंतर्गत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजा कृष्णार येथे दि.23 मार्च 2022 ते 29 मार्च 2022 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन दिनांक 24/03/2022 ला
मा. ज्ञानेश्वर गव्हाणे गट विकास अधिकारी पं.स.एटापल्ली यांनी केले. तर अध्यक्षस्थानी मा. दिपक देवतळे गटशिक्षणाधिकारी पं.स एटापल्ली हे होते. या सात दिवसीय शिबीरात बौध्दिक सत्रात गर्भवती व स्तनदा मातांची आहार तालिका व सिकलसेल या विषयावर डॉ. राकेश नागोसे, क्षयरोग उपचार व घ्यावयाची काळजी या विषयावर कु. दिक्षा रामटेके, कोरोना लसिकरण यावर कु. ठाकरे मॅडम, सौ. बंडावार मॅडम, जलसंवाद व जलसंवर्धन व स्वच्छता या विषयावर श्री जीवनदास उराडे व श्री. करण मडावी, मतदान जनजागृती अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. श्रमदानामध्ये गावातील परिसर स्वच्छता व नाल्यांची साफसफाई करण्यात आली तसेच गावातील नाल्यावर पाणलोट बंधारा बांधण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात अंधश्रध्दा, स्वच्छता, मतदान जनजागृती इत्यादी विविध विषयावर कार्यक्रम सादर करून जनजागृती करण्यात आली. 28/03/2022ला शिबीराच्या
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धर्मरावबाबा आत्राम आमदार तथा सचिव, भगवतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी हे होते तर प्रमुख अतिथी मा जयराजजी हलगेकर, प्राचार्य डॉ एस एन बुटे, श्री. बंडूजी हिचामी, श्री सदाशिव हिचामी, पोलीस पाटील, श्री. जगन्नाथजी मडावी, श्री. लूलाजी हिचामी, भूमिया, संबाजी हिचामी, नामदेव हिचामी नगरसेवक, घिसूजी हिचामी, किशोर कांदो, सचिन हिचामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस एन. बुटे, अहवाल वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी संदीप मैद तर संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विश्वनाथ दरेकार तर आभार प्रा.डॉ बाळकृष्ण कोंगरे यांनी मानले. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सूधिर भगत, प्रा. विनोद पत्तीवार, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डॉ शदरकुमार पाटील, प्रा. राजीव डांगे, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. राहूल ढबाले प्रा अतूल बारसागडे, प्रा. चिन्ना पूगाटी, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. श्रुती गुब्बावार, प्रा. डॉ. स्वाती तंतरपाळे, श्री. मुनेश्वर मोहूले इत्यादीनी तसेच कुष्णार येथील नागरीकांनी सहकार्य केले.