जुलैमध्ये नांदेडमधून निघणार अमरनाथ यात्रा

जुलैमध्ये नांदेडमधून निघणार अमरनाथ यात्रा

जुलैमध्ये नांदेडमधून निघणार अमरनाथ यात्रा

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760
गेल्या दोन वषार्पासून कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेमुळे बंद असलेली अमरनाथ यात्रा १ जुलै ते १३ जुलै या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली. कोरोनामुळे दोन वर्ष यात्रा बंद होती.मात्र यंदा दि.३० जून पासून सुरु होऊन ४३ दिवस चालणार असल्याची घोषणा जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी केली आहे.यामुळे नांदेड येथून एकोणिसावी अमरनाथ यात्रा निघणार आहे.

पुरातन काळापासून अमरनाथ या ठिकाणी वर्षभरातून फक्त दोन महिने बफार्चे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी कश्मीर ला जातात.नांदेड येथून सतत अठरा वर्ष अमरनाथ यात्रा अखंडितपणे सुरू होती, पण गेल्या दोन वषार्पासून यात्रा न भरल्यामुळे अनेक भाविक अत्यंत उत्सुकतेने यात्रेची वाट पाहत होते.अमरनाथ यात्री संघाच्यावतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर यात्रेचे आयोजन केल्या जाते.

अवघड असणारी अमरनाथ यात्रा सुखरुप पार पडावी यासाठी नियमित चालण्याचा सराव व प्राणायाम संपूर्ण भारतात फक्त नांदेड येथेच घेण्यात येते. कितीही आणीबाणीचा प्रसंग आला तरी दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत हजारो भाविकांची यात्रा सुखरूप पार पडली आहे. यंदाच्या यात्रेत अमरनाथ, वैष्णो देवी, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पटनी टॉप,खिरभवानी शक्तीपीठ, जम्मू अमृतसर, बाघाबॉर्डर या स्थळांचा समावेश आहे.