चोरानां चोर म्हणणाऱ्यांना दोन वर्षाची शिक्षा होत असेल आणि खासदारकी रद्द केल्या जात असेल तर ही लोकशाही नाही दडपशाही आहे – डॉ. नामदेव किरसान

अमित कुमार वैध

सालेकसा तालुका प्रतिनिधि 

7499237296

दिनांक 26 मार्च 2023 रोजी आंबेशिवनी टोली ता. जि. गडचिरोली येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान भारतीय संविधानातील लोकशाहीचे महत्व पटवून देतांना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची लोकसभेची सदस्यता रद्द केल्याचे अनुषंगाने बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रोहिदासजी राऊत, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार व आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी मार्गदर्शन केले. मंचावर माजी जि प सदस्य रामभाऊ मेश्राम, प्रभाकरजी वासेकर, माजी उपसभापती विलासजी देशमुखे, हंसराजजी उंदीरवाडे, प्रदीपजी भैसारे, कविताताई मडावी, विजयजी बनसोड, सरपंच संगीता ताई टेंभुर्णे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहनजी पाल, पोलीस पाटील भाईसारेजी, वसंतराव पाटील चुधरी, पथरुजी सावकार भैसारे, माजी पं. स. सदस्य संध्याताई झंझाळ, जीवनजी सहारे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने युवक बंधू भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here