सरकारनं धार्मीक स्थळासाठी पैसा द्यावा की शिक्षणक्षेत्र वा उद्योग?

अंकुश शिंगाडे 

९३७३३५९४५०

नागपूर: आज धार्मीक क्षेत्राचा विकास होत आहे. सरकार विकासाच्या नावानं धार्मीक क्षेत्राला जास्तीत जास्त पैसा देत आहे. तो कोट्यवधीच्या घरात आहे. त्यातच अशा धार्मीक क्षेत्रातील काही लोकांवर छापे टाकले तर असं आढळून येतं की त्या व्यक्तीजवळ कितीतरी मालमत्ता आहे. अशा कितीतरी व्यक्ती अशा धार्मीक क्षेत्रातील सदस्य आहेत.
धार्मीक स्थळी भरपूर पैसा असतो. लोकं धर्मभावनेतून कितीतरी प्रमाणात मंदिरात दान देत असतात. कारण लोकांची श्रद्धा असते. काही पैसा काळाही असतो.

काळा पैसा……..भ्रष्टाचार करुन मिळविलेला पैसा. भ्रष्टाचार असे व्यक्ती की ज्यांना स्वतःचा स्वार्थ असतो. माझं आणि माझ्या परिवारातील लोकं कसे पुढील काळातही श्रीमंत राहतील याचा विचार ते करीत असतात. परंतू अशा व्यक्ती समुदायाला आपण केलेल्या कर्माची भीतीही असते. त्यांना आपण पाप करीत आहोत हे कळतं. म्हणून तीच मंडळी सढळ हातानं दान करीत असतात व आपण किती धार्मीक नमस्कार दानशूर आहोत याचा दिखावा करीत असतात.
धार्मीक क्षेत्रातील दानदाते हे अज्ञात असतात. ते पुढे येत नाहीत व आपण दान दिलेला पैसा शो करीत नाहीत. तसेच ते हुशारही असतात. त्यांना माहीत असते की आपण जर आपला पैसा रितसर पावतीनं दिला तर उद्या आपल्या घरी इनकम टॅक्सची धाड पडेल व आपली पुर्ण संपत्ती जप्त करण्यात येईल. म्हणून ते आपली संपत्ती लपवीत असतात. परंतू त्यांनी जे कर्म केलेले असते. ते लपविण्यासाठी धार्मीक स्थळी दान केल्यानं पाप कर्माचं क्षालन होतं असा दृष्टीकोण हेरुन ती मंडळी जे दान देतात. त्याला गुप्त दान म्हणतात. विचार असा आहे की असं गुप्त दान केल्यानं वर जो परमात्मा असतो. तो जास्त पावन होतो. म्हणून हे गुप्तदान प्रचलीत झालेलं आहे.

गुप्तदानानाचा सरळ सरळ अर्थ आहे. तो म्हणजे आपल्या पापाचं क्षालन व्हावं व तेही गुप्त पद्धतीने. आपला पैसा लपवता यावा. म्हणून उपयोजीलेली उपाययोजना. या दानाचा आपल्या देशाच्या दृष्टीकोणातून विचार केल्यास त्या दानातील पैशानं आपला देश खरंच सृजलाम सुफलाम होवू शकतो व आपल्या देशाचा विकास होवू शकतो. हे निर्वीवाद सत्य आहे.

आज सर्वात जास्त पैसा धार्मीक क्षेत्रात आहे. त्याचा विचार केला तर तो पैसा गोळा करुन तो पैसा शिक्षणाला लावावा. सरकार धार्मीक क्षेत्राचा विकास करीत आहे. पैसा हा धार्मीक क्षेत्रात असलेली कमाई. ज्या कमाईतून फुल ना फुलाच्या पाकळीच्या स्वरुपात टॅक्सच्या रुपात पैसा मिळत असतो. हा पैसा देशाच्या कामात येतो.
खरं तर धार्मीक गोष्टीसाठी पैसा द्यावा. कोट्यवधीचा पैसा द्यावा. त्याचा विकास करावा. कारण त्या क्षेत्रासाठी लोकं दानाच्या रुपात पैसा देतात. ज्यातून देशविकासासाठी पैसा गोळा होतो.

सरकारनं धार्मीक क्षेत्रासाठी पैसे द्यावे. त्याचा विकास करावा आणि त्यातून देशविकासासाठी पैसा गोळा करावा. हा पैसा गोळा करुन त्या पैशातून देशात उद्योगधंदे उभारावेत व सर्व प्रकारचं शिक्षण अगदी निःसंकोचपणे नि:शुल्क द्यावे. ज्यावेळी शिक्षण निःशुल्क होईल. सर्वच मुलं शिकू शकतील. त्यात गरीबांची मुलंही शिकू शकतील. कारण हुशारी ही केवळ श्रीमंतांच्याच घरी नसतात तर ती गरीबाच्याही घरी असतात. परंतू गरीबांना शिक्षणाला जास्त पैसा लागत असल्यानं ते उच्च शिक्षण घेवू शकत नाहीत. त्यांचं शिक्षण खोळंबत असतं.

देशाचा विकास होईल, या दृष्टिकोनातून सरकारनं धार्मीक क्षेत्राला कोट्यवधीचा पैसा अनुदानरुपात द्यावा. देवू नये असं नाही. परंतू काही पैसा हा निःशुल्क शिक्षणासाठी द्यावा. ज्यातून वेगवेगळ्या समाजाचे, वर्गाचे निःशुल्क तंत्रज्ञ तयार होवू शकतात. तसंच उद्योगधंदे उभारल्याने देशातील अशा सर्व समाजातून व वर्गातून आलेल्या सर्व लोकांमधील तंत्रज्ञांना वाव मिळू शकतो. ज्यातून देशालाही भरभराटीस आणता येवू शकते यात शंका नाही. मात्र धार्मीक क्षेत्रातून फक्त उच्च जातीच्याच मुलांना रोजगार मिळू शकतो. तोही जास्त प्रमाणात नाही. तसंच धार्मीक क्षेत्रात गुप्त दान येत असल्यानं तो गुप्त दानाचा पैसा मोजता येत नाही, ही वास्तविकता आहे. त्यातच असा धार्मीक स्थळाला येणारा पैसा ते गुप्त दान असल्यानं व जास्त वापरता येत नसल्यानं त्या क्षेत्राला तरी जास्त पैसा का द्यावा? हा प्रश्न आहे.

लोकांनी गुप्त दान अवश्य करावे. परंतू ते धार्मीक स्थळी नाही. शिक्षण क्षेत्रासाठी दान करावे. एखादी गरीबाची शाळा दत्तक घ्यावी वा एखादा गरीब मुलगा दत्तक घ्यावा. त्याला चांगलं शिकवावं. जेणेकरुन त्या मुलातील एक चांगला तंत्रज्ञ तयार होईल. तसंच गुप्त दान उद्योगधंदे उभारण्यासाठी सरकारी खात्यात टाकावे. जेणेकरुन सरकारी उद्योग तयार होतील व ही गरीबांची मुलं तंतज्ञ म्हणून त्या शाळेत लावता येतील. तेव्हाच देशातील उद्योगधंद्याचा विकास होईल. देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जाईल. तसंच बेरोजगारीची समस्याही दूर करता येईल. यात शंका नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here