वृद्धेचा आधार बनले माणगांव पोलीस, माणगांव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-माणगांव तालुक्यातील उतेखोल गावात राहणारी वृद्ध महिला अनुसया बाबुराव देशमुख वय वर्ष ९० ह्या माणगांव पोलीस स्टेशनं येथे आल्या असता माझे कोणी नातेवाईक जिवंत नसून मला माझ्या राहण्यासाठी सोय करा असे माणगांव पोलीस ठाण्यात बोलंल्या असता माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सह पोलीस निरीक्षक सतिष आस्वर, पो. उप निरीक्षक विक्रांत फडतरे, पो. हवालदार किरण तुणतुने, किशोर कुवेस्कर, मिलिंद खिरीट, प्रीती ओमले, पो, शिपाई गोविंद तलवारे, रामनाथ डोईफोडे, दिपाली मोरे यांनी त्याच्या नातेवाईक याच्याकडे चौकशी केली असता सदर महिला ही रागाच्या भरात घरातून निघून गेली असे समजले.

सदर मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की वृद्ध महिला अनुसया देशमुख याची मुलगी सिमा कदम वय वर्ष ६८ व जावई रमेश कदम वय वर्ष ७२ रा. उतेखोल माणगांव यांच्याकडे वृद्ध महिला हिला माणगांव पोलीस घेऊन गेले असता वृद्ध महिला हिला समजवता घालण्याचा पर्यन्त केला परंतु सदर महिला हिने मी घरी राहणार नाही मला घरी ठेवले तर मी जीव देईन असे सांगितले सदर महिला घरी राहण्याच्या मनस्थितीत नसल्याने तिला माऊली वृद्धाश्रम बोरवाडी निजामपूर येथे दाखल केले व वृद्ध महिला अनुसया देशमुख हिची पूर्वस्थ जबाबदारी व काळजी तिचे नातेवाईक घेणार असे समजले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here