एम एम जगताप कॉलेज महाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय निवासी शिबिर संपन्न

60

एम एम जगताप कॉलेज महाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय निवासी शिबिर संपन्न.

भालचंद्र खाडे
माणगाव प्रतिनिधी
९०४९३२३८३६

माणगाव,२७ मार्च: महाड येथील लोकविकास सामाजिक संस्था महाडचे एम एम जगताप कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर सोमवार दिनांक 13 मार्च 2023 ते रविवार दिनांक 19 मार्च 2023 या कालावधीत उत्कृष्टरित्या संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी श्री संजय चिखले सर व कोकरे गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, अनेक वरिष्ठ व ज्येष्ठ नागरिक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते .दुसऱ्या दिवशी सकाळी कोकरे गावात विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता करून लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली आणि जलसंवर्धन व वनसंवर्धन याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.

मंगळवारी सकाळी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनातर्गत कोकरे गावातील नदीवर सुमारे चाळीस ते पन्नास फूट लांब व सुमारे सहा फूट रुंद असा वनराई बंधारा बांधण्यासाठी सुरुवात केली त्या कामी ग्रामस्थांनी प्लास्टिकच्या पिशव्या विद्यार्थ्यांना आणून दिल्या संपूर्ण बंधारा हा बांधून पूर्ण झालेला असून त्यामुळे नदीपात्रामध्ये सुमारे 400 ते 500 घनमीटर पाणी साठून राहील अशी अपेक्षा आहे. या शिबिरामधून विद्यार्थ्यांना अनेक चर्चासत्राद्वारे प्रबोधन पर माहिती देण्यात आली. प्रथम दिवशी श्री सुधीर वाणी स्वदेश फाउंडेशन यांच्यामार्फत पथनाट्य सादरणीकरणाबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. दुसऱ्या दिवशी उद्योजकता विकास बद्दल सौ नीता सेठ मॅडम यांनी माहिती दिली तर श्री. के. बी. तिरमले नायब तहसीलदार निवडणूक विभाग यांनी मतदार जनजागृती व मतदार नोंदणी याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच श्री भालचंद्र खाडे यांनी विद्यार्थ्यांना जीएसटी व टॅक्स संबंधी मार्गदर्शन केले तसेच श्री किरण शिरगावकर दिलासा फौंडेशन अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन जगताना ग्रामपंचायतीतील कारभारासंबंधी महत्त्वाची माहिती दिली व ग्रामपंचायत येथील नियोजन व ग्रामस्थांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. राहुल वारंगे सह्यद्री मित्र संस्थेचे अध्यक्ष महाड यांनी गिर्यारोहणाबाबत माहिती उपलब्ध करून दिली.

रविवार रोजी समारोप प्रसंगी महाडचे नायब तहसीलदार श्री.सुरेश खोपकर साहेब व श्री संजय चिखले सर कोकरे गावातील सरपंचांच्या वतीने नंदू गोठल, उपसरपंच एकनाथ मोरे पोलीस पाटील श्री. विठ्ठल पवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत निकम गावातील ज्येष्ठ नागरिक श्री नारायण रांजणकर व इतर अनेक व्यक्ती उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक कल्याणी शिंदे मॅडम कॉलेजमधील संतोष जगताप आणि इतर कर्मचारी वर्ग प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

तसेच हे शिबिर यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाणी एम एन यांनी विशेष प्रयत्न केले व सर्व नियोजन करून संपूर्ण सात दिवसाचे निवासी शिबिर यशस्वी केले त्यांचे व सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हनुमंत जगताप (नानासाहेब),व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांचे कौतुक केले व भविष्यकाळात असेच कार्य करावे म्हणून प्रोत्साहन दिले.