गोेरेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत्ती मोठया उत्साहात साजरी
✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव लोणेरे विभाग प्रतिनिधी.
📞संपर्क-७०२११५८४६०.
गोरेगाव लोणेरे – गोरेगाव येथील रोहिदास गर्जना मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंत्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गोरेगांवातील एकमेव छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा संत रोहिदास नगर मध्ये असल्याने चलभैरी ग्रुप शिवप्रेमी ग्रुप तर्फे शिवज्योत याठिकाणी आणली जाते यावेळी मंडळातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यंदाही रोहिदास गर्जना मंडळ गोरेगांव तर्फे शिवरायांच्या जयंत्तीचे औचित्य साधत लहान मुलांकरीता संगीत खुर्ची, वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे तर महिलांसाठी खेळ पैठणीचा अशा खेळांचे २ दिवस आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये संगीत खुर्ची मध्ये आरोही आंबेतकर हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक वेदांत बिरवाडकर तसेच वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रं. संकल्प गोरेगांवकर द्वितीय क्रं. प्रांजल गोरेगांवकर तर तृतीय क्रमांक काव्या गोरेगांवकर हिने पटकावला तर पैठणीची मानकरी ठरली साक्षी गोरेगांवकर व मानसी गोरेगांवकर.
यावर्षी छत्रपती शिवरायांची जयंत्ती यशस्वी आणि उत्साहात साजरी करण्याकरीता उत्सव अध्यक्ष रोशन गोरेगांवकर, ओम गोरेगांवकर, किरण गोरेगांवकर, आदित्य गोरेगांवकर , अनुज गोरेगांवकर , श्रवण गोरेगांवकर, रोशन श. गोरेगांवकर तसेच महिला मंडळ व रोहिदास गर्जना मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.