अवैध रेती घेऊन जात असलेला टीप्पर घेतला त्याब्यात

अवैध रेती घेऊन जात असलेला टीप्पर घेतला त्याब्यात

✍️त्रिशा राऊत ✍️ नागपूर क्राईम रिपोर्टर
मो 9096817953

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025

भिवापूर :- नांद पोलिस चौकी अंतर्गत पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना एका दहा चक्की पांढरे निळ्या रंगांचे वाहनामध्ये अवैध रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने भिसीकडून – नांद कडे जात असतांना दि. 28 मार्चला सकाळी 11 वाजता सदरच्या टिप्परची तपासणी केली असता या टिप्परमध्ये विनापरवाना रेती आढळून आली. यावेळी पंचसमक्ष पंचनामा करण्यात आला. सदर टिप्पर चालकाने क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रेती भरून रेतीची चोरीटी वाहतूक करतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातील टिप्परमध्ये 4 बॉस रेती व टिप्परटिप्परमध्ये 4 बॉस रेती व टिप्पर क्रमांक MH – 40 BL 5645 असा दोन लक्ष, वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टिप्पर मालक मोरेश्वर लहुजी चुटे मुक्काम नांद व चालक पंकज पुंडलीक जांभुळे मु. पुयारदंड ता. चिमुर यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली.