माझी शाळा, ज्युबिली शाळा!
अनिकेत एम खोब्रागडे
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मो.8390140705
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज चंद्रपूरच्या गौरवशाली ज्युबिली हायस्कूलची पाहणी केली. या शाळेने देशभक्ती, मूल्ये आणि संस्कार देत असंख्य आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. शाळेच्या नुतनीकरणाच्या कामांची पाहणी करताना, शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असल्याचे पुनः स्पष्ट केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
शाळेच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. या शाळेने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले असून, ही शाळा केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वोत्तम शाळांपैकी एक व्हावी, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.