कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे निव्वळ फार्स: मनुष्यबळाचा वापर चुकीच्या पद्धतीने

58

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे निव्वळ फार्स: मनुष्यबळाचा वापर चुकीच्या पद्धतीने.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे निव्वळ फार्स: मनुष्यबळाचा वापर चुकीच्या पद्धतीने.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे निव्वळ फार्स: मनुष्यबळाचा वापर चुकीच्या पद्धतीने.

साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रातिनिधी✒
यवतमाळ,दि.29 एप्रिल:- कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कात जवळ पास तीस लोकांची यादी तयार करण्याचे काम म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. परंतु या अपदा व्यवस्थापणाच्या काळात सदर काम हे आवश्यक तितके परिणाम कारक दिसत नसून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे पुढे येत आहे. याचबरोबर यासाठी कुशल मनुष्य बळ समजल्या जाणाऱ्या समाजातील महत्वाचा घटक असलेल्या शिक्षकांना कामाला लावले आहे यातून संसर्गजन्य परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या या प्रयत्नात कुठेतरी चुकीच्या पद्धतीने मनुष्यबळाचा वापर होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना सारख्या कठीण काळात आरोग्य विभाग मोठया हिमतीने काम करत असतांना अन्य विभागाकडून त्यांना मदत होऊन परिस्थिती कशी नियंत्रणात येयील यासाठी काम करण्याची खरी गरज आता निर्माण झाली आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी यांच्या मनमानी व नको त्या हट्टामुळे वेगवेगळ्या विभागाची मदत मिळत असूनही ती आरोग्य विभागासाठी म्हणावी तशी फायद्याची ठरत नाही. एकीकडे रुग्ण आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्ती नेमक्या किती दिवसापासून संपर्कातील पाहिजे याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. शिवाय पॉझिटिव्ह रुग्णाला तपासणी केल्यानंतर चार ते पाच दिवसांनी समजते की तो पॉझिटिव्ह आलाय. या अहवाल प्राप्त होण्याच्या मधल्या चार-पाच दिवसात तो बिनधास्तपणे वावरल्याने कित्येकांच्या संपर्कात आलाय हे त्यालाही माहीत होत नाही.

सुशिक्षित्यांचा अपवाद वगळता सर्रास हाच प्रकार घडतो आहे. यातही काही ठिकाणी निगेटिव्ह आलेल्या रुग्णाचे पॉझिटिव्ह यादीत नाव आल्याचे समोर आले आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिक्षकांचा मात्र गोंधळ उडताना दिसत आहे. शिक्षकांनकडे आलेल्या यादीनुसार शिक्षक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे काम करीत आहेत. यातही सद्यस्थितीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या यादी बरोबरच तीन महिन्यांनपूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या आणि कोरोनामुक्त  झालेल्या रुग्णांची यादी देखील त्यांना देण्यात येत आहे. यातून आकडेमोड नेमकी कशासाठी होत आहे हा प्रश्नही समोर येत आहे.

तीस जणांची यादी असा अट्टाहास का: रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये किमान तीस लोकांची यादी करावयाची आहे आहे मात्र बहुतांशी रुग्ण रुग्ण सद्यस्थितीमध्ये दहा ते पंधरा जणांच्याच संपर्कात येत आहेत. त्याची कारणे सुद्धा वेगवेगळी आहेत. यात किमान 30 जणांची यादीच का पाहिजे हा अट्टाहास का? याचे उत्तर संबधीतांकडे सद्या नाही.         

लसीकरनासह अन्य जनजागृतीसाठी काम आवश्यक: सद्यस्थितीमध्ये आरोग्य विभागावर मोठा ताण असून यातील रुग्णांचा उपचार व सद्यस्थितीत सुरु असलेले लसीकरण यात ही यंत्रणा पूर्णतः गुंतलेली आहे. शिक्षकांच्या किंवा अन्य विभागाच्या माध्यमातुन लसीकरनासह इतर जनजागृतीसाठी काम होने गरजेचे आहे मात्र नको तिथे यंत्रणा काम करत आहे.