बल्लारपुर येथे पोलिस कर्मचाऱ्यांना फेश शिल्ड व मास्कचे वाटप

55

बल्लारपुर येथे पोलिस कर्मचाऱ्यांना फेश शिल्ड व मास्कचे वाटप

बल्लारपुर येथे पोलिस कर्मचाऱ्यांना फेश शिल्ड व मास्कचे वाटप
बल्लारपुर येथे पोलिस कर्मचाऱ्यांना फेश शिल्ड व मास्कचे वाटप

सौ .हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपुर,दि.29 एप्रिल:- जिल्हात आणि शहरात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना वायरसमुळे आज बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने, चंदन भैय्या चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुखांच्या उपस्थितीत, फेश शील्ड व शिल्डचे वाटप करण्यात आले.

कोरोना वायरस मुळे जनता आणि पोलीस प्रशासनात भितीचे वातावरण आहे. अनेक पोलीस कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र जनतेसाठी राबत आहे. त्यामूळे काल बल्लारशाह पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी काशीशिंग यांच्याशी संपर्क साधला आणि शहरातील गोल पुलिया पॉईंट येथे तैनात पोलिस कर्मचार्‍यांनी काशीसिंग यांना सांगितले की, फेश शिल्ड व मास्क मिळाले तर खुप छान होईल.

काशीशिंग यांनी लगेच संपर्क साधून आमदार सुधीर मुनगंटीवार आणि इतर नेत्यांना ही बाब सांगितली. त्यामूळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लगेच चेहरा कवचची व्यवस्था केली.

मागील वर्षी कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा पोलिसांची शुगर, बीपी इत्यादी आजार चेकअप कम्प आयोजित करुन त्यांचे चेकअप तपासणी करण्यात आली होती. या तपासणी शिबिरात सर्व पोलीस जवानांची तपासणी करण्यात आली होती. आजच्या या कार्यक्रमात काशीशिंग आणि सोबत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते निलेशभाऊ खरवडे, समीर केने, महामंत्री मनीष पांडे, युवमोर्चाचे अध्यक्ष ऍडव्हकेट रंननज्य सिह, महामंत्री घनश्याम बुरडकर, जिग्नेश चंदे, प्रमोद, ओमप्रकाश, बबलू गुप्ता, नसिफ भैया अन्सारी, साई अलगेवार, अतुल व अन्य लोकांची उपस्थिती होती.