डॉ. अतुल घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन महाजन कडून आनंद सोनचाफा वृक्षभेट.
प्रा. अक्षय पेटकर वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
वडणेर:- हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथे डॉ. अतुल घोरपडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सचिन महाजन यांनी रुक्ष देऊन वाढदिवस साजरा केला. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्य एक झाड लावून वाढदिवस साजरा करावा वाढदिवसानिमित्त झाड दयावे व गावात किंवा शाळेत, ग्रामपंचायत, अंगणवाडी, पोलीस, मंदिर, घरी एक झाड लाऊन आपला वाढदिवस साजरा करावा. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन यांनी दिला.
हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथे डॉ. अतुल घोरपडे यांच्या घरी वृक्षारोपन करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश तर दीला त्याच बरोबर आपल्या जीवनातील एक आटवन म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक, वेळोवेळी पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा व गावातील नागरीकांचे समाजाचे काही तरी वेळातून वेळ काढून समाजासाठी काम करायला पाहीजे तरच जीवनाचे खरे सार्थक आहे. असे मत सचिन महाजन यांनी व्यक्त केले. या वेळेस वृक्षारोपन कार्यक्रमाच्या वेळेस राजेंद्र आलाम, मयूर भोयर, संकेत हाते, रणजित हाते, नेहरू युवा केंद्राचे तालुका प्रतिनिधी सचिन महाजन उपस्थीत होते.