कळमेश्वर जोड मारुतीची ईतीहासिक रथ यात्रा रद्द.
कोरोना मुळे माघिल दोन वर्षा पासुन रथ यात्रेत खंड.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रातिनिधी✒
कळमेश्वर,दि29 एप्रिल:- शहरातील जोड मारुती मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या गावात भव्य रथ यात्रा काढण्याची माघील अनेक वर्षाची परंपरा होती. या भव्य रथयात्रेने या कार्यक्रमाचा समारोप केला जात होता. सर्वत्र प्रसिद्ध असलेली ही रथयात्रा यावर्षी बुधवारी दिनांक 28 आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना संक्रमणामुळे ही रथयात्रा रद्द करण्यात आली. या रथयात्रेत कोरोना वायरसमुळे सलग दुसऱ्या वर्षी खंड पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कळमेश्वर शहरातील श्रीराम प्रभू व हनुमान यांच्या रथयात्रेला 255 वर्षाची येथे एक परंपरा लाभली आहे या यात्रेत विदर्भ सोबत मध्य प्रदेशातील हजारो भाविक सहभागी होतात ही रथयात्रा दरवर्षी हनुमान जयंती नंतर दोन दिवसांनी आयोजित केली जाते. रामनवमी पासून या धार्मिक कार्य व कामाला सुरुवात केली जाते. कार्यक्रम व रथयात्रेच्या योग्य नियोजनासाठी रथ यात्रा उत्सव समिती स्थापन केली जाते. ही रथयात्रा मंदिरापासून बाजार चौकापर्यंत काढण्यात येते. यावेळी भजन कीर्तन भारुड प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जोड मारुती चौकाजवळ मंदिराजवळ दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. ही दहीहंडी आकर्षणाचे केंद्र असते. शहरवासी यासाठी ही रथयात्रा आकर्षणाचे केंद्र असते. या रथयात्रेला रात्री अकरा वाजता सुरुवात केली जाते. संपुर्ण गावात भ्रमण करत असताना बाजार चौक हनुमान मंदिराजवळ उभा केला जातो. जोड मारुती चौकात दहीहंडीचे आयोजन केले जाते तरुणाचे नृत्य करतात व दानपट्टाच्या प्रतीक्षेत शाही आयोजन केले जाते. दुसर्या दिवशी बच्छे कंपनीची धमाल असते.
या कार्यक्रमात तमाशाने जागरण दरवर्षी आयोजित करण्यात येते. पण यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या रथयात्रेची विधिवत पूजा रद्द करुन रथयात्रा रद्द करण्यात आल्याने बुधवारी रात्री जागेवर श्रीराम प्रभू हनुमान व रथाची अर्चना पाठक यांच्या कुटुंब यांच्या हस्ते विविध पूजा करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष स्मृति इखार उपाध्यक्ष जोशना मंडपे मुख्य अधिकारी स्मिता काळे उपस्थित होते मागील वर्षी ही रथयात्रा 9 एप्रिल व 10 एप्रिल रोजी आली होती.