नांदेड वनविभागाच्या कारभारामुळे सामाजिक कार्यकर्तानी केल आत्मदहन; जळुन झाला कोळसा.

✒नांदेड जिल्हा प्रतिनिधि✒
नांदेड,दि.28 एप्रिल:- नांदेड जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सामाजिक कार्यकर्ताला आत्मदहन करुन आपल्या प्राणाला मुखाव लागल. त्याच्या देहाचा पुर्णत कोळसा झाल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
नांदेड जिल्हातील चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा RTI माहिती अधिकार कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे वय 52 वर्ष यांनी वन विभागातील झालेल्या बंधाऱ्यांच्या बोगस कामाची आणि भष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व जिल्हात हरीण व मोरांच्या हत्या करण्यात आली होती त्याची सखोल चौकशी व्हावी यासह इतर मागण्यांच्या संदर्भात ता. 28 रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन ता. 16 मार्च रोजी दिले होते. मात्र भष्ट्र प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही. त्याला केळाच्या तोपलीत फेकून दिले.
ठरल्यानुसार त्यांनी बुधवारी ता. 28 एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता चोंडी जवळील वनविभागाच्या जमिनीवर शिवदास संभाजी ढवळे यांनी स्वताःला जाळून घेऊन आत्मदहन केले आहे. या खळबळजनक घटनेनंतर माळाकोळी पोलिस ठाण्यात मयताचे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी गर्दी करुन शिवदास ढवळे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
नांदेड जिल्हातील चोंडी परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर मागील काही वर्षांपूर्वी मनरेगातुन मातीनाला बांधकाम करण्यात आले होते. यावेळी चार हरीण व 10 मोरांची हत्या झाली होती. या संदर्भाने सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींना पाठीशी घालत कार्यवाही केली नाही असे सांगत शिवदास ढवळे यांनी वेळोवेळी निवेदन देत कार्यवाही करण्याची विनंती केली. शेवटी त्यांनी आत्मदहनाचा इशारा देवून ता. 28 एप्रिल रोजी वनविभागाच्या सर्व्ह्ये नंबर 64, 132, 133 या ठिकाणी असलेल्या मातीनाला बांध येथे पहाटे साडेपाच वाजता अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्मदहन केले आहे.
भष्ट्र वन विभागाच्या अधिका-यांवर कारवाई करावी.
या घटनेनंतर भष्ट्र वन विभागाच्या अधिका-यांवर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. त्यांचा वर कारवाई करावी म्हणून अनेक लोक समोर आले आहे.