सांगली जिल्ह्यातील खाजगी अधिपरीचारीकांचे जिल्हाधिकारी यानां निवेदन.

57

सांगली जिल्ह्यातील खाजगी अधिपरीचारीकांचे जिल्हाधिकारी यानां निवेदन.

सांगली जिल्ह्यातील खाजगी अधिपरीचारीकांचे जिल्हाधिकारी यानां निवेदन.
सांगली जिल्ह्यातील खाजगी अधिपरीचारीकांचे जिल्हाधिकारी यानां निवेदन.

प्रशांत कदम सांगली जिल्हा प्रातिनिधी✒
सांगली,दि.29 एप्रिल:- जिल्हा अंतर्गत कार्यरत असणार्या कोविड सेंटर मधील खाजगी अधिपरीचारीकांच्या कोविड रुग्णांच्या सेवे दरम्यान येणार्या समस्यां बद्दल आज दि. 29 रोजी महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनीयन तर्फे जिल्हाधिकारी सांगली यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चासत्र आयोजीत करण्यात आले.

कर्तव्य बजावत असताना अधिपरीचारीका संवर्गातील कर्मचार्यांना विविध अडचणींना व संभाव्य धोक्यांना सामोरे जावे लागत असुन कोविड सेंटर व रुग्णालय प्रशासकांकडुन कार्यपुर्तीकरीता सदर कर्मचार्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आहे. म्हणजेच शासन निर्णया विरोधात अधिपरीकांचे काम करण्याचे तास वाढविणेत आले आहेत तसेच सदर कर्मचार्यांना कोविड भत्ता स्वरुपातील रक्कम देणेस रुग्णालयीन प्रशासने टाळाटाळ करीत असल्याची तक्रार इत्यादी मुद्द्यांवर आज जिल्हाधिकार्यां सोबत झालेल्या बैठकी दरम्यान या विविध विषयांवर चर्चा करुन संबधीत खाजगी अधिपरीचारीकांच्या अनेक अडचणींचे सविस्तर छायाचित्र  जिल्हाधिकारी यांचे समोर मांडणेत आले.

तसेच सदर अडचणींवर अतिशीघ्र तत्वावर उपाय योजना करणेबाबत सुचविण्यात आले. तसेच तात्काळ कारवाई न झालेस आंदोलनाचा इशारा देणेत आला आहे. सदर भेटी प्रसंगी महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनीयनचे सचीव श्री. तेजस कागवाडे, संघटक श्री.शकिल मुजावर,महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन राज्य संचालक राफेल गायकवाड, सल्लागार समीतीचे प्रशांत कदम, स्वप्नील मधरासी, तसेच इतर पदाधिकारी व संघटणेचे सदस्य उपस्थीत होते.