मृत्यू नंतरही यातना संपेना: कुटुंबियांनी टाकला मृतकाच्या अंतिम संस्कारावर बहिष्कार.

 सौ.हनिशा दुधे ✒
बल्लारपुर तालुका प्रतीनिधी
बल्लारपूर :-  दिनांक 27 एप्रिल 21 ला दुपारी 4.30 वाजता बल्लारपूर तालुक्यातील मोजा मानोरा येथील श्री. प्रदीप सीताराम कोवे वय 58 वर्ष यांचे आकस्मिक निधन झाले. ते मागील एक आठवड्यापासून तापाने असल्याचे समजले. त्यांच्या मृत्यु कोरोना या गंभीर आजाराने झाला असा समज कुटुंबियांनी आणि गावकर्‍यांचा झाला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हते. गावातील सरपंच व उपसरपंच यांनी सुद्धा पुढाकार घेतला नाही. त्यामुळे शेवटी प्रशासनाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. अतुल कोहपरे यांनी पी.पी.ई किट दिले. बल्लारपूर चे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी कोविड-19 आजाराने मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करणारी टीम दिली. बल्लारपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर रात्री 12 वाजता मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासाठी श्री. किरण कुमार धनवाडे संवर्ग विकास अधिकारी, श्री. अजय धोंडरे आणि चमूने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here