शिरगाव महाड दरम्यान सुरु असलेल्या रस्त्याचे काम संथगतीने  दीड किमी अंतराला लागले दोन महिने  नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

शिरगाव महाड दरम्यान सुरु असलेल्या रस्त्याचे काम संथगतीने
 दीड किमी अंतराला लागले दोन महिने
 नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

शिरगाव महाड दरम्यान सुरु असलेल्या रस्त्याचे काम संथगतीने  दीड किमी अंतराला लागले दोन महिने  नागरिक आणि वाहनचालक त्रस्त
✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड शहरानजीक असलेल्या महाड शिरगाव गावा दरम्यान सुरु असलेल्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम संथगतीने सुरु असून अवघ्या दीड किमी अंतराच्या या कामास दोन महिने लागल्याने रस्त्याशेजारील ग्रामस्थ आणि वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरालगत असलेल्या या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदाराला रान मोकळे झाले आहे.
महाड शहरातून विन्हेरे तुळशीखिंड मार्गे खेड आणि दापोली, मंडणगड, म्हाप्रल जाणारे मार्ग दादली, शिरगाव या गावांना जोडत जातात. सद्या महाड म्हाप्रल पंढरपूर तसेच दापोली मधील आंबडवे गावला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम सुरु आहे. यातील एक टप्पा महाड दादली शिरगाव या गावांदरम्यान सुरु आहे. कॉंक्रीट पद्धतीने येथील काम सुरु असून रस्त्याचे रुंदीकरण देखील केले जात आहे. याकरिता मूळ डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून टाकला आहे. दोन्ही बाजूला मातीचा भराव कांही दिवसातच हे काम संथ गतीने केले जात आहे. दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शिरगाव दादली हे अंतर जेमतेम दीड किमी आहे. शिवाय महाड शहरालगत असल्याने याठिकाणी सतत वर्दळ सुरु आहे. आंबेत पूल बंद असल्या कारणाने दापोली, मंडणगड, म्हाप्रल, कडे जाणारी तर महामार्गाचे काम सुरु असल्याने खेड कडे जाणारी वाहने देखील याच मार्गावरून ये जा करत आहेत. दादली शिरगाव दरम्यान रस्त्याचे काम सुरु असल्याने आणि पक्का पर्यायी मार्ग न केल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा स्थानिक वाहनचालकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
महाड जवळील सावित्री नदी वर असलेला दादली पुलावरील रस्ता आधींच खराब झाला असून त्यापुढे सुरु असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे दादली आणि शिरगाव दरम्यान असलेल्या नागरिकांना धुळीचा देखील सामना करावा लागत आहे. दादली – किंजळघर गावातील अनेक घरे या रस्त्यालगत आहेत. वाहनचालकांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ घरातून जात असल्याने घरात मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. शिवाय दादली शिरगाव याठिकाणी असेल्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे देखील हाल झाले आहेत. अवघ्या दीड किमी रस्त्याला दोन महिने लागल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित ठेकेदाराकडून खोदलेल्या ठिकाणी पाणी मारले जात नसल्याने हि धूळ उडत आहे. शिवाय ज्या ठिकाणी रस्ता बदल केला आहे त्याठिकाणी कोणत्याच प्रकारचे फलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता चुकण्याची वेळ येत आहे.
पर्यायी रस्ता न करताच रस्त्याचे काम
महाड शिरगाव दरम्यानचा मार्ग हा वर्दळीचा मार्ग आहे. याठीकानाहून महाड कडून विन्हेरे आणि मंडणगड, म्हाप्रल कडे जाणारी वाहनांची संख्या मोठी आहे. शिवाय या परिसरातून महाड शहर तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची देखील ये – जा सुरु असते. यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. रस्त्याचे काम सुरु करताना पर्यायी डांबरी रस्ता किंवा मुख्य कॉंक्रीट रस्त्याच्या शेजारील साईडपट्टी डांबरीकरण करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता न करताच कॉंक्रीट रस्ता काम सुरु केल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.