किरकोळ वादातुन जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप, माणगावं सत्र न्यायालय चा महत्वपूर्ण निर्णय
सचिन पवार माणगावं तालुका प्रतिनिधी.८०८००९२३०१
माणगावं सविस्तर वृत्त असे की सदरची घटना महाड एम आय डी सी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील मौजे बोरगाव येतील गणपत निकम यांच्या कॉरीवर दि १५ एप्रिल २०१९ रोजी ६.३० ते १६ एप्रिल २०१९ रोजी ७.३० चे दरम्यान घडला आहे.
सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की आरोपी महादेव गजानन पाटोले रा केरेवाडी ता कवठे मंहाकाल जि सागली याने मयत साहेब राव जयवंत चव्हाण उर्फ नाना हे गणपत निकम याच्या खडी क्रिशरवर ड्रिल मारण्याचे काम करत होते. काॅरीवर बोरिग गाडीतच राहून जेवण करून तिथेच झोपायचे.
आरोपी महादेव पाटोले व मयत साहेबराव चव्हाण यांच्या मध्ये कामावरून वाद होवून आरोपी यांने मयत यांस स्टीलच्या पाईपने मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले.
वरिल घटनेची फिर्याद महाड एम.आय.डी.सी पोलीस ठाणे येथे दाखल झाले असुन भा.द.वी.स. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास महाड एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी केला व आरोपी विरूद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सदर खटल्याची सुनावणी आति.सह जिल्हा न्यायाधीश सो.येथे झाला सदर गुन्ह्यात साक्षीदाराच्या साक्ष वैद्यकीय तसेच तांत्रिक पुरावा महत्त्वाचा ठरला.
सदर खटल्यांमध्ये म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्याय निर्णय दाखल केले.सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी आधिकारी पोलीस उपनिरीक्षक यु.एल.धूमासकर पोह.छाया.कोपनर शशीकांत कासार ,पैरवी आधिकारी व पो.ह.शशीकांत गोविलकर पोशि सुनील गोले, सोमनाथ ढाकणे याने सहकार्य केले.
मा.आति.सञ न्यायाधीश टी.एम.जहागिरदार यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनतर आरोपीला दोषी ठरवून दिनांक २७ एप्रिल २०२२ रोजी आरोपीस भा.द.वि.क.३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व २०,००० दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.