“रिफायनरी हटवा कोंकण वाचवण्यासाठी सामाजिक संघटनांचे दादर येथील तीव्र विरोध निदर्शने
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मुंबई- दि.२८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता दादर रेल्वे स्टेशन, स्वामी नारायण मंदिर समोर भारतीय लोकसत्ताक संघटना,भीम आर्मी, कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा आदी. सामाजिक संघटनेच्यावतीने धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले. शेकडोच्या संख्येने युवक रिफायनरीच्या विरुद्ध आज रत्यावर उतरले होते सर्वांचा एकच नारा “रिफायनरी हटवा कोंकण वाचवा” . सदर प्रकल्पास स्थानिक नागरिक यांचा मोठ्या प्रमाणत विरोध तर आहेच पण आता मुंबईतील चाकरमानी नागरिक देखील कोंकण वाचवा असा नारा देत कोंकण वासियांच्या बरोबर उभे राहत आहेत.
नागरिकांचा प्रचंड विरोध असून देखील सदर विरोध मोडीत काढीत शासन सदर प्रकल्प उभा करीत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून सदर रासायनिक रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय शासनाने तातडीने माघे घ्यावा अशीच या आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते पदाधिकारी करीत आहेत.
सदर प्रकल्प हा अत्यंत धोकादायक असून सदर बारसू परिसरात असलेल्या या रिफायनरी प्रकल्पात कच्च्या खनिज तेलावर प्रक्रिया झाल्यावर पेट्रोल, डिझेल, एलपीजी, डांबर, आदी उत्पादने मिळतील. ती तयार झालेली सर्व उत्पादने पुन्हा खाडी-समुद्रातून पाईपलाईनद्वारे निर्यात करावी लागतील. याठिकाणी फक्त तेल शुद्धीकरणाचाच प्रकल्प उभारण्यात येणार नसून त्यासोबत पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स बनवून त्यात रासायनिक द्रव्ये व प्लास्टिक बनवण्याचे अधिक धोकादायक उद्योग असणार आहेत.
सदर प्रकल्पामुळे निसर्गाची तसेच विविध प्रकारे जैविक हानी होणार तर आहेच पण याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणत असणार आहे , कर्क रोग ,रोग प्रतिकार शक्ती कमी होणे,मोती बिंदू, डोळ्यांच्या पद्याला इजा , रुदय विकाराचे झटके , फुफुसांचे आजार, अवकाळी मृत्यू , त्वचेचे विकार, लहान बळांवर परिणाम ,प्रजणानावर होणार आधी विविध सदर प्रकल्पामुले होणारे दुष्परिणाम आहेत.तसेच कोंकणातील निसर्गाचे हे खूप मोठे नुकसान आहे. रिफायनरी मधील सोडले जाणारे दूषित पाण्यामुळे नद्या समुद्राची खूप मोठे नुकसान होणार आहे आणि याचा परिणाम बागायती कामावर होणार आहे.
सदर आंदोलनास सहभागी झालेले कार्यकर्ते पदाधिकारी मा. अमोलकुमार बोधिराज (अध्यक्ष) मा वैभव मोहिते ,मा. दिपीका आंग्रे, मा. मनिष जाधव, मा. पिलाजी कांबळे, मा. किरण गमरे, मा. गुणवंत कांबळे, मा. ऍड.रूपाली खळे, मा. अंकिता मोरे. मा. योगेश कांबळे, मा वैशाली कदम, मा मयुरेश जंगम, मा. अमित खैरे, मा. संदिप कांबळे, मा. मनिष कदम , मा. अभिषेक कासे,राजू कदम,रमाकांत जाधव,बुध्दभूषण येलवे, अक्षय मोहिते ,स्वप्नील पवार,कुणबी युवा संघाचे अध्यक्ष महादेव कांबळे, भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, जेष्ठ समाजसेवक सुमेध जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाईक, अनिल कदम, दिलीप शेडेकर यांच्यासह शेकडो कोकणवाशी चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.