तिरोडा नगरपालिका सुस्त अतिक्रमणधारकांकडून फुटपाथ गिळंकृत अपघात वाढ रेतीचे ट्रक भर शहरातुन वाहतुक फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने तिरोडा कर हैराण, पादचाऱ्यांना त्रास

तिरोडा नगरपालिका सुस्त अतिक्रमणधारकांकडून फुटपाथ गिळंकृत अपघात वाढ रेतीचे ट्रक भर शहरातुन वाहतुक फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने तिरोडा कर हैराण, पादचाऱ्यांना त्रास

तिरोडा नगरपालिका सुस्त अतिक्रमणधारकांकडून फुटपाथ गिळंकृत अपघात वाढ

रेतीचे ट्रक भर शहरातुन वाहतुक फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने तिरोडा कर हैराण, पादचाऱ्यांना त्रास

तिरोडा नगरपालिका सुस्त अतिक्रमणधारकांकडून फुटपाथ गिळंकृत अपघात वाढ रेतीचे ट्रक भर शहरातुन वाहतुक फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने तिरोडा कर हैराण, पादचाऱ्यांना त्रास

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9843386558

तिरोडा : – तिरोडा शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा केला निर्माण केला आहे. त्यामुळे अपघात वाढ होवुन काही दिवसांपुर्वी शिक्षिकेला जिव गमवावा लागला, एवढे अतिक्रमण होऊनही नगर परिषद प्रशासन कारवाई करताना दिसत नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. फेरीवाले व हातगाडीवाल्यांनी शहीद मिश्रा विद्यालय जवळील हा रस्ता नेहमी व्यापलेला असल्याने वाहतूक कोंडी होते. नागरिकांना दुचाकी वहाने चालविणे कठीण झाले आहे. शहरातील काही रस्त्यांवर फुटपाथची झालेली दुरवस्था आणि
अनेक रस्ते फुटपाथविनाच असल्याने
तिरोडा कर त्रस्त झाले आहेत.

शहरात मुख्य रस्त्यावर फूटपाथ नसल्याने एकप्रकारे पादचाऱ्यांची नाकाबंदीच करण्यात आल्याचे चित्र आहे. मागील १५ वर्षांत शहराचा विस्तार वाढला असून, नगरपरिषद शहराचा विकास व सुव्यवस्थेबाबत उदासीन दिसत आहे.शहराच्या प्रमुख समस्या जैसे थे ठेऊन फक्त आलेला विकास निधी खर्च करण्यावर भर देण्यात आला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील फुटपाथ व पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची पाहणी केली. आता रस्ते, अतिक्रमण नागरिकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेतल्यास त्यातील फुटपाथचा समोर आला. फोलपणा फुटपाथवर नाकाबंदी तिरोडा शहराच्या मुख्य मार्गावर दुकानदारांनी पार्किंग, बस स्टॉपसमोर वेल्डिंग दुकानदार सर्विस रोड वर कबाळी साहीत्य ठेवल्याने अपघात होवु शकते डाॅ. पारधी याच्या दवाखान्यातील जवळील रस्तातयावर ट्रक व ट्रॅक्टर पार्किंग केले जात आहे. बहुतेक ठिकाणी सर्व्हिस रोडवर कार दुरुस्तीचे गॅरेज म्हणून वापर होत आहेत हॉटेल वाल्यांनी पार्किंग केल्याने वाहतूक ठप्प होते .हे केल्याने पादचाऱ्यांसाठी रस्ताच राहिला नाही.शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक वाहनाऐवजी पायी जाणे पसंत मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद करतात; परंतु रस्त्यापर्यंत फुटपाथवर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून मार्ग शोधावा लागतो. यात अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते.

ज्येष्ठ नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. नगर परिषदेने ही अतिक्रमणे काढावीत. *सेवानिवृत्त शिक्षक लिल्हारे ज्येष्ठ नागरिक*

त्यामुळे भविष्यात
अपघाताचा धोका बळावला आहे.
अतिक्रमण काढणे हे न.प. चे
काम असून त्यांना अतिक्रमण काढण्याकरिता सहकार्य करण्यास पोलिस विभाग तयार आहे
*पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे*

शहरातील चंद्रभागा ते सुकडी नाका चौक, चंद्रभागा नाका ते काँग्रेसु आॅफिस, युनियन बँक चौक ते रेल्वेस्टेशन ,मंत्री निवास ते रेल्वे चौकी, रस्ते व रस्ते.स्थानिक व्यावसायिक व फेरीवाल्यानी फुटपाथ शहरातील मुख्य मार्गावरील संपूर्ण फुटपाथची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी मोठ्या झाडांनी फुटपाथ अडविला आहे. दुकानदारांच्या पाठ्या, बांधकामाचे साहित्य, दुकानातील वस्तू, पार्किंग केलेली वाहने, व्यावसायिक यामुळे फुटपाथवर जणू नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अडथळे निर्माण झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
सदर मेन रोड नॅशनल महामार्ग असल्यानेअतिक्रमण काढणे व मार्ग करणे त्या विभागाचे काम आहे. नगर परिषदेच्या वतीने अंतर्गत अतिक्रमण काढण्याची कारवाई अतिक्रमणधारकांनीच गिळल्याचे मुख्य मार्ग अरुंद झाला असून पादचाऱ्यांना भर वाहतूकीच्या रस्त्यावरून पायी चालावे लागत आहे. शहराच्या मुख्य मार्गावरून पायदळ जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन कार्यवाही करावी, जेणेकरून कोंडी होणार नाही.संबधित अतिक्रमण करून वाहतुकीस अडसर करण्यात करण्या-या कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल
सह मुख्याधिकारी कांबळे न.प. तिरोडा.