महाड तालुक्यामध्ये एका अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या वाकी खुर्द गावच्या हद्दीत रानवडी फाट्याच्या आत जंगलामध्ये झाडाला टांगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

महाड तालुक्यामध्ये एका अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या वाकी खुर्द गावच्या हद्दीत रानवडी फाट्याच्या आत जंगलामध्ये झाडाला टांगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

महाड तालुक्यामध्ये एका अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

वाकी खुर्द गावच्या हद्दीत रानवडी फाट्याच्या आत जंगलामध्ये झाडाला टांगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

महाड तालुक्यामध्ये एका अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या वाकी खुर्द गावच्या हद्दीत रानवडी फाट्याच्या आत जंगलामध्ये झाडाला टांगलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

✍️रामदास चव्हाण ✍️
बिरवाडी महाड प्रतिनिधी
📞7276705457📞

महाड :-आज दिनांक 28 एप्रिल रोजी महाड तालुक्यातील महाड – शिवथर रोड लगत वाकी खुर्द गावच्या हद्दीतील जंगलामध्ये एका अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. रानवडी खुर्द येथील रहिवाशी संदीप राजाराम पार्टे यांनी याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे खबर दिली आहे. बेवारस मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नसून आत्महत्येचे कारण देखील अस्पष्ट आहे. सदरचा मृतदेह सुमारे 50 ते 55 वयोगटातील असून 15 ते 20 दिवसापासून झाडाला दोरीच्या साह्याने टांगलेला होता. त्यामुळे संपूर्ण मृतदेह पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. घटनास्थळी महाड एमआयडीसी पोलीस व बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर दाखल झाले असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदर मृत्यू देहाची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत.