म.अंनिसने केली वैज्ञानिक प्रात्यक्षिकाद्वारे मुलींच्या मनातील भूतबाधेची भीती दूर !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
भंडारा: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती तुमसर मार्फत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह तुमसर येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि भूत या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह तुमसरच्या गृहपाल कांता कोकाटे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमात मुलींच्या मनात भूत, प्रेत याबद्दल असलेली भीती वैज्ञानिक प्रात्यक्षिकाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. युवराज खोब्रागडे यांनी मुलींना मनातील भूत नावाचे भूत काढून घेण्याचे आवाहन केले. म.अंनिस लाखनी तालुक्याच्या कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे यांनी भूत, प्रेत, करणी, जादूटोणा या गोष्टी अस्तित्वात नाही. त्यामुळे घाबरून न जाता सत्य, असत्याची पडताळणी करावी असे आवाहन केले.
म.अंनिसचे बुवाबाजी राज्य सहकार्यवाह विष्णुदास यांनी बुवाबाजी करणारे सामान्य माणसांची कशी फसवणूक करतात. व समाजात अंधश्रद्धा कशी पसरवतात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. भूत,भानामती जादूटोणा यांचे अस्तित्व सिद्ध करावे व २५ लाख रुपये मिळावे असे आवाहन विष्णुदास लोणारे यांनी केले . या कार्यक्रमाचे संचालन पीएलव्ही आश्लेषा कुंभलकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीएलव्ही.एम एम बावनकर, नितेश बोरकर, रक्षित कांबळे, योगेश कांबळे , अवनी लोणारे व आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.