निळज गावात खडकाळ जमिनीतून वाहू लागले पाण्याचे झरे

निळज गावात खडकाळ जमिनीतून वाहू लागले पाण्याचे झरे

निसर्गाचा चमत्कार बघण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी…

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगांव तालुक्यातील इंदापूर विभागातील निळज हे गाव मुंबई व गोवा हायवे पासून नजीक असून हे गांव डोंगर माथ्यावर उंचावर वसलेले आहे. निळज गांव हे पाणी टंचाई ग्रस्त गाव आहे. अशा या गांवाच्या खडकाळ जमीन lवर एप्रिल महिन्यात अचानकपणे निसर्गाचा चमत्कार झाला असून गेली चार ते पाच दिवसा पासून पाण्याचे झरे वाहू लागल्याने निळज ग्रामस्थ हे झरे पाहून आश्चर्य चकित झाले आहेत. हे वाहणारे झरे पाहण्यासाठी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. काही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की, या खडकाळ भागात आमच्या पिढ्यान पिढ्या होऊन गेल्या. उन्हाळ्यात एप्रिल मध्ये या भागात कधीच पाणी बघायला भेटले नाही ते या वर्षी अचानक पणे कसे काय पाणी वाहू लागले? हा ग्रामस्थांना मोठा प्रश्न पडला आहे. या गावात जलजीवन मिशन ही योजना या गांवासाठी खालून तळावातून नेली असून या तळावात देखील एप्रिल, मे महिन्यात पाणी हे कमी होताना दिसत असून अचानक पणे डोंगर माथ्यावर उंचावर निळज बौध्दवाडी आणि आदिवासी वाडी यांच्या मध्येभागी खडकाळ भागावर चार ते पाच दिवसा पूर्वी निसर्गाचा चमत्कार झाला असून या गावात पाण्याचे झरे वाहू लागल्याने या भागातील नागरी वर्ग हे या पाण्याचे झरे बघण्यासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत.फोटो ओळ – निसर्गाचा चमत्कार, डोंगर भागात अचानक वाहू लागले पाण्याचे झरे.