ढालघर फाटा ते विंचवली रस्त्यालगत जुन्या झाडाला आग; वीजपुरवठा खंडित, जिवीतहानी टळली…!
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड मुंबई – गोवा महामार्गापासून ढालघर फाटा ते विंचवली लगत असणाऱ्या कालव्या जवळील एक जुने सुकलेले भलेमोठे झाड २३ एप्रिल रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास आग लागल्याने जवळून जाणाऱ्या विद्युत वाहक खांबावर पडल्याने संपूर्ण विजेची तार रस्त्यावर पडली होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तारतांत्रिक (वायरमन) यांना रात्री बारा वाजता होडगांव येथील व्यक्तीने फोन लावून सांगितले तेंव्हा तारतांत्रिक (वायरमन) यांनी येऊन संपूर्ण वीज बंद केल्यामुळे जिवीतहानी टळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून तारतांत्रिक (वायरमन) यांनी आजूबाजूला असणारी सर्व झाडे तोडून त्याठिकाणी दोन नवीन पोल उभे केले तसेच संपूर्ण दिवसभर आजूबाजूच्या गावातील यावेळी वीज खंडीत करण्यात आली होती. नागरिकांना थोडासा गरमी मुळे त्रास सहन करावा लागला. परंतु या पूर्व विभागातील सर्वच तारतांत्रिक (वायरमन) रात्री – अपरात्री नागरिकांना मदत करत असतात. तसेच वेळोवेळी रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या फ़ांद्या तोडून तारेचे खांब मोकळे करतात.
तसेच रात्रीच्या सुमारास पडलेली तार कोणाच्याही नजरेत आली नव्हती परंतु होडगाव येथील व्यक्तीच्या नजरेस पडली आणि त्यांनी लगेचच तारतांत्रिक (वायरमन) यांना कळविल्यामुळे जीवितहानी टळली. त्यानंतर एम.एस.ई.बी. चे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी सर्व अडथळे दूर केले आणि दोन नवीन खांब उभारून वीजपुरवठा सुरळीत सुरू केला. यावेळी तारतांत्रिक (वायरमन) नितीन धसाडे, मंगेश तोंडलेकर, रमेश गायकवाड, आकाश जाधव यांनी दिवसभर मेहनत घेऊन उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. त्यांच्या कार्यतत्पर कामगिरीमुळे पूर्व विभागातील नागरिक त्यांच्या या कामावर खूष आहेत.