पायल पाटीलची कामगिरी अभिमानास्पद

पायल पाटीलची कामगिरी अभिमानास्पद

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पायलने पूर्ण केले

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- जिद्द आणि चिकाटी असेल तर शारीरिक कमतरतेवर सहज मात करता येते, हे पायल पाटीलने दाखवून दिले आहे. अलिबाग जवळच्या ग्रामीण भागातील घोटवडे येथील पायलला ऐकू येत नव्हते तरी देखील बारावीच्या कला शाखेतील परीक्षेत ८०.३० टक्के गुण प्राप्त केले होते. पीएनपी शैक्षणिक संस्थेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पायलने पटकावला होता. दहावीच्या परिक्षेत सुद्धा ९० टक्के गुण मिळवून, पायलने प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तिच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले होते. आई शेतात काम करून घर चालवते. त्‍यामुळे घरची आर्थिक परिस्थिती देखील बिकट होती. परिस्थितीवर मात करत जिद्दीने तिने शिक्षण पूर्ण केले.

पायलची आकलन शक्‍ती कमालीची होती. एक शब्‍दही ऐकायला येत नसतानाही ती शिक्षकांच्‍या ओठांच्‍या हालचालींवरून शिकली. अभ्‍यासाबरोबरच वक्‍तृत्‍व स्‍पर्धेतही ती अव्‍वल असायची. कर्णबधीर झाल्‍यानंतरही तिनं अभ्‍यासाचा ध्‍यास सोडला नाही, आणि जिद्दीच्‍या जोरावर तिने यशाचे शिखर गाठले. कर्णबधीर असल्याने पायलच्‍या कानावर कोचलर इन्‍प्‍लांन्‍ट सर्जरी ही शस्‍त्रक्रिया करायची होती. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मा. आमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांनी तिच्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये यशस्‍वी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. तिने देखील जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते त्यामुळे पहिल्याच प्रयत्नांत ती तलाठी परीक्षेत पास होऊन रुजू झाली ती पीएनपीची माजी विद्यार्थी आहे याचा सार्थ अभिमान आहे, स्पर्धेच्या युगात जे मेहतन घेतील तेच यशस्वी ठरतात हे पायलने सिद्ध करून दाखवले पायलचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे चित्रलेखा पाटील सत्कारा प्रसंगी म्हणाल्या.

सरकारी अधिकारी तलाठी म्हणून रुजू झाल्याबद्दल पायलचा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी पायलचे कुटुंबिय आणि घोटवडे ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व

आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.