पनवेलमधील राजकारणात उलथापालथ, जे एम म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांचा मोठा निर्णय…

पनवेलमधील राजकारणात उलथापालथ, जे एम म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांचा मोठा निर्णय…

हिरामण गोरेगावकर
एप्रिल 29, 2025
पनवेल रायगड.

पनवेल : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जे. एम. म्हात्रे यांनी शेकाप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (29 एप्रिल) पनवेलमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला.
शेकापमधील काही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाच शेकापचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांनी मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने पनवेल तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रितम म्हात्रे यांनी उरणमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपचे महेश बालदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर रिंगणात होते. महाविकास आघाडीत असूनही मविआच्या दोन उमेदवारांनी उरणमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळे शेकापमध्ये प्रचंड नाराजी होती. प्रितम म्हात्रे विजयाच्या थोड्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे हा पराभव त्यांच्या आणि शेकापच्याही जिव्हारी लागला होता
आता जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांनी जरी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी अद्याप मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पडद्यामागे काही राजकीय घडामोडी सुरू आहेत का, याची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रितम म्हात्रे यांनी यांनी इतर पक्षात जाण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत . जे एम म्हात्रे यांनी आपल्या सोबत या बाबत काही चर्चा केली नाही . असे त्यांनी माध्यमांना सांगितले .

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व‎आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.