शिक्षा लघुपटाला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

221

शिक्षा लघुपटाला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, कलेतून होणाऱ्या समाजप्रबोधनाच उत्तम उदाहरण

मुंबई: लय भारी production YouTube channal प्रस्तुत शिक्षा लघु फिल्म लेखिका सौ.बबिता गावस यांनी उत्तम प्रकारची वेगळी कथा लिहून सामाजिक संदेश दिला आहे.दिग्दर्शक प्रमोद न सूर्यवंशी यांनी उत्तम प्रयत्न करून कथेला न्याय दिल्याने लघुपट लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

रमेश मारुती पाटील आणि प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्तम संवाद लिहून सामाजिक संदेश दिला. यातील कलाकार सुद्धा  मनाला भावणाऱ्या अभिनयाने लोकांना आकर्षित करत आहे.गौरव पुंडे, आणि प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्तम संकलन केले असून संतोष रामचंद्र जाधव, रेखा चंद्रकांत हरियाण, सोनिया गोळे, योगेश हरणे, अंजली महाजन, श्रीराम घडे, शरद घुडे, उत्तम कुलकर्णी या सर्व नवीन कलाकारांनी उत्तम अभिनय करून एक छाप सोडल्याने लोकांना शिक्षा लघुपट आवडत आहे.

शिक्षा लघुपटाला इंटरनेशन, नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सध्या सोळा पुरस्कार मिळालेले असून गोवा फिल्म फेस्टिवल, मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये ही मानाच्या पुरस्कारांमध्ये नामांकन मिळून नक्कीच पुरस्कार विजेता ठरेल, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

सर्व प्रेक्षक वर्ग यांनी लघुपट पाहून  केलेल्या कौतुकामुळे आम्हा सर्वांना नवीन ऊर्जा येते अजून काही नवीन करण्यासाठी प्रेरणा मिळते. तुमचे प्रेम असच सर्व नवीन कलाकारांवर असूद्या, असे आवाहन सदर लघुपटात काम केलेल्या कलाकारांनी केले आहे.