मुलगी पाहीजे होती, पण मुलगा झाला; हैवान बापाने रागाच्या भरात मुलाची दगडावर आपटून केली हत्या.

49

मुलगी पाहीजे होती, पण मुलगा झाला; हैवान बापाने रागाच्या भरात मुलाची दगडावर आपटून केली हत्या.

मुलगी पाहीजे होती, पण मुलगा झाला; हैवान बापाने रागाच्या भरात मुलाची दगडावर आपटून केली हत्या.
मुलगी पाहीजे होती, पण मुलगा झाला; हैवान बापाने रागाच्या भरात मुलाची दगडावर आपटून केली हत्या.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.29मे:- उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक ठिकाणी वंशाचा दिवा हवा म्हणून मुलीची हत्या करण्यात आल्याच्या घटना समोर येत असतात पण,  एका व्यक्तीला वंशाची पणती हवी होती म्हणून स्वताःच्या पोटच्या मुलाला हैवान बापाने दगडावर आपटुन हत्या केली. स्वता:च्या पोटच्या चिमुकल्याची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याने सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हैवान आरोपी बापाच नाव भजन कौरती असं आहे तर मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव सत्यम कौरती 1 वर्ष असं आहे. भजन कौरती यांना कन्या हवी होती. मात्र त्यांना वंशाचा दिवा झाला. याच रागातून भजन यांचं त्यांच्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर भांडणाच्या रागात भजन यांनी आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला दगडावर आपटून त्याचा जीव घेतला.

या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी येथे घडली आहे. या घटनेनंतर संबंधित आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. संबंधित चिमुकलीच्या आईने आपला मुलगा तर गमवलाच सोबतच पतीलाही तुरुंगात पाहावं लागत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी भजन कौरती हा काल संध्याकाळी दारूच्या नशेत घरी आला. येताच त्याने पत्नीसोबत वाद सुरू केले. पुन्हा दारू पिण्यासाठी त्याने पत्नीकडे पैसे मागितले, तेव्हा त्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार देताच भजन याने मला मुलगी हवी होती, तू मुलाला जन्म दिल्याचं म्हणत त्याचा एक वर्षीय चिमुकला सत्यमला उचलून अंगणातील दगडावर फेकले. लहानग्या सत्यमच्या डोक्याला ईजा झाल्याने सत्यमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना क्षणात घडल्याने सत्यमला वाचवण्याची कुणालाही संधी मिळाली नाही. आरोपी भजन याची पत्नी मथुराच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.