हिंगणघाट शहरात मनसे तर्फे मोफत सनिटायझर फवारणी.
शहरात वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मनसे’ची हिंगणघाट शहरात व शहरातील संपूर्ण वॉर्ड, घरोघरी निःशुल्क सनिटायझर फवारणी सेवा.

✒️मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒️
हिंगणघाट:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंगणघाट शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मनसे सरसावली असून संपूर्ण शहरात निर्जतुकिकरण करण्याकरिता महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट शहरात निःशुल्क सॅनिटायझर फवारणी सेवा सुरू करण्यात आली असून आज या निःशुल्क फवारनीला 10 दिवस पूर्ण झाले. आज दिनांक 29 मे ला हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्ड या ठिकाणी निर्जूकीकरण करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांनी आनंद व्यक्त करत, मनसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले’ यांचे आभार मानले.