तीन महिन्यांपूर्वी केला प्रेम विवाह, पत्नीने शिवा दिल्याने, पतीने गळा दाबून पत्नीची हत्या.

51

✒️पुणे जिल्हा प्रतिनिधी✒️
पुणे,दि.29 मे:- पुणे जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे येथील देहूगावात एका नवविवाहित दापत्याच्या झालेल्या किरकोळ घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याच समोर आल आहे. पूजा वैभव लाकमाने असे मयत तरुणीचे नाव आहे.

पूजा आणि वैभव यांनी तीन महिन्यांपूर्वीच लव मैरिज केल होते. त्यानंतर हे दोघे देहूगावामधील साई नगरी, वडाचा मळा याठिकाणी ते राहत होते. मात्र, अवघ्या काही दिवसांत गोडीगुलाबीत सुरु असलेल्या त्यांच्या संसारात खटके उडू लागले. पूजा आणि वैभव यांच्यात काही दिवसांपूर्वीच जोरदार भांडण झाले होते. यावेळी पूजाने वैभवला आईवरुन शिवी दिली. ही शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने पत्नीचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी वैभवला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
नीलम खरात संकलन