कोंबड्यांच्या रागावर वचपा म्हणून मुलीचा विनयभंग.

57

कोंबड्यांच्या रागावर वचपा म्हणून मुलीचा विनयभंग.

कोंबड्यांच्या रागावर वचपा म्हणून मुलीचा विनयभंग.
कोंबड्यांच्या रागावर वचपा म्हणून मुलीचा विनयभंग.

आशीष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
बुटीबोरी:- पाळीव कोंबड्यांनी शेजारी राहणार्‍या एका इसमाच्या अंगणात घाण केली. याच गोष्टीचा वचपा म्हणून त्याच्या मुलाने कोंबडी पाळणार्‍या मुलीचा विनयभंग केला. ही घटना बुटीबोरीत घडली.

सागर सीताराम उईके असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी चौदा वर्षीय पीडित मुलीला आरोपीने कोंबडी घाण करते असे म्हणत आपला राग व्यक्त केला. हा प्रकार पाहता पीडित मुलीने तत्काळ त्याच्या अंगणातील घाण साफ करून अंगण चकाचक करून दिले. दरम्यान अंगण झाडल्यानंतर ती घरी परत जात असताना आरोपी सागर उईके याने तिला थांबवून विनयभंग केला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.