राज्यपालांशी समन्वय साधून देण्याच्या आश्वासणावर उपोषण मागे (तेलीगल्ली-साईवाडी व शंकरवाडी प्रकल्पात सुद्धा चोरी)

53

मुंबई दि (प्रतिनिधी):- या चोरांचे नशीब बलवत्तर म्हणून की काय मला वारंवार आंदोलनाला विविध कारणांमुळे परवानगी नाकारली जाते आणि हे चोरांचे पातक उघडे पाडण्यास दिरंगाई होते अशी खंत डॉ माकणीकर यांनी व्यक्त केली.

अंधेरी एमआयडीसी परिसरात झोपडपट्टी सुधार योजनेत महाचोर विकासक विमल शहा व फ्रॉड रद्दबातल नगरसेवक महादलाल मुरजी कांजी पटेल व एमआयडीसी चे तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांनी महाघोटाळा उघड करण्यासाठी २६ मे २०२१ रोजी आमरण उपोषण घोषित होते.

मात्र: मा. उच्चन्यायलयाचे आदेश आणि कोविड साथीच्या प्रादुर्भावामुळे पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारून
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी वपोनी मा. निसार कुलकर्णी, मिल स्पेशल श्री. लावंड आणि मलबार हिल पोलीस ठाण्याचे मील स्पेशल श्री. जगताप यांनी
मा. राज्यपालांशी समन्वय साधून देण्याच्या अश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले.

एमआयडीसी सह बृहन्मुंबई महानगर पालिका के पूर्व विभागात झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत साईवाडी, शंकरवाडी शिवाजी नगर, हरी नगर परिसरात ही असाच भोंगळ कारभार चालवला असून याही प्रकरणाचे बिंग राज्यपालांच्या भेटीत फोडणार असल्याचे रिपब्लिकंपार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी सांगितले.

मा. राज्यपालांशी समन्वय साधणाऱ्या शिष्ठमंडळा मध्ये उपोषणकर्ते डॉ राजन माकणीकर सह पक्षप्रमुख कनिष्क कांबळे, कॅप्टन श्रावण गायकवाड व अन्य एक जणांचा समावेश आहे.