खरे बोलले तर सख्ख्या आईलाही राग….

47

खरे बोलले तर सख्ख्या आईलाही राग….

रामदास गिरटकर, जिल्हा कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर

खरे बोलले तर सख्ख्या आईलाही राग.
खरे बोलले तर सख्ख्या आईलाही राग.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- खरे बोलले तर सख्ख्या आईलाही राग येतो. मग गुरुजनांना का येणार नाही. ? पण, म्हणून सत्य न बोलणे हा मोठाच अपराध ठरेल. म्हणून आज पुन्हा बोलतो आहोत. मास्तरांना राग आला तर आला. सरकारने वर्षभर शाळा-कॉलेज बंद ठेवले शिक्षक प्राध्यापकांना ५० टक्केच उपस्थितीची

मुभा दिली. सगळ्या परीक्षा रद्द केल्या. यात सरकारचे किंवा मास्तरांचे काहीच नुकसान झाले नाही. नुकसान झाले ते विद्यार्थ्यांचे आपली शिक्षण व्यवस्था दहा वर्षे मागे गेली.पण कोणाही शिक्षक किंवा शिक्षकांच्या संघटनेने या बाबत सरकारकडे परीक्षा घ्या म्हणून शाळा-कॉलेज सुरु ठेवा म्हणून आग्रह धरल्याचे ऐकिवात नाही. शिक्षक संघटनांनी मागण्या कोणत्या केल्या, तर कोरोना काळात २५ टक्के वेतन कपात करू नका. आम्हाला फ्रंट लाईन वर्कर म्हणून आमचे विमा कबच कायम ठेवा.आम्हाला बाढीब महागाई भत्ता द्या. प्रभारी म्हणून अतिरिक्त कामांचे बाढीब वेतन द्या, या शिक्षक संघटनेच्या मागण्या आहेत. त्यातच आता आमचे गुरुजन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आमची चेतननिश्चिती करण्याचा निर्णय मागे घ्या. म्हणून सरकारशी भांडायला उठलेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर नाही तर मग कशावर करायची वेतन निश्चिती? तुमची नियुक्ती नेमकी आहे कशासाठी? मुलांना शिकवण्यासाठी त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी की त्यांना पोषण आहाराचे डाळ-तांदूळ-मसाला वाटण्यासाठी किंवा खिचडी शिजवून खिलवण्यासाठी ? वर्षभर शाळेत हेलपाटे घालता ते काय फक्त महिन्याकाठी पगार मोजून घेण्यासाठी? अजीर्ण वाटावा असा गलेलठ्ठ पगार घेऊन कामाशी प्रतारणा करता? मुलांच्या गुणवत्तेवर पगार निश्चित करू नका म्हणता ? जगातल्या सगळ्या शैक्षणिक संस्था अस्थापना, संशोधन क्षेत्र, उद्योग जगत,कला विश्व,क्रीडा क्षेत्र, राजकारण या सर्व क्षेत्रात स्कील आणि आउटपुटच्या आधारावरच वेतन ठरते.अगदी असंघटित क्षेत्रातील कामगार मजुरांच्या बाबतीत सुद्धा हाच निकष आहे. असे असताना शिक्षक काय आभाळातून पडलेत? की तीच्या कानातून आलेत? गुरुजन न त्यांचा त्यांच्या ज्ञानाचा सर्वानी आदर करायचा. त्यांचा सन्मान करायचा. त्यांना गुरासारखा पगाराचा पोटभर हिरवा चारा खिलवायचा, आणि त्यांनी दूध सोडा, शेणाचीही अपेक्षा ठेवू नका म्हणायचे,शेणावरून आमच्या चाऱ्याचे प्रमाण ठरवू नका म्हणायचे, हे जरा अतीच नाही का झाले? शिक्षकच जर गुणवत्तेची जबाबदारी स्वीकारायला तयार नसतील तर या देशाचे आणि पुढच्या पिढीचे शैक्षणिक भवितव्य कोणत्या डगरीवर आहे हे आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या कोरोना काळात सर्वात सुखी प्राणी कोण असेल तर तो मास्तर शाळा नाही, परीक्षा नाहीत, पेपर तपासण्याची कटकट नाही. निकाल लावण्याची झंझट नाही. शाळा प्रवेशाची मश्शकत नाही. पगार मात्र सुरु. सारे कसे मस्त चालू आहे. सकाळी पार्श्वभूमीवर उन पडेस्तोवर पालथे पडायचे. नंतर मग शुचिर्भूत होऊन नाश्ता, पेपरबाचन व्हाटस अँप दर्शन अजगरासारखं आळोखेपिळोखे , पुन्हा दिवसभर देत लोळायचं, जमल्यास टिव्ही दर्शन, फोन बाजी, त्यावर सगळ्या जगाची टबाळकी,मग दुपारचे मिष्टान्न भोजन नावालाच ऑनलाईन टरफले बेचायची. पुन्हा हवामकुक्षी संध्याकाळी ‘सोय’ आणि रात्री पुन्हा सोशल मिडीयावर गोरगरीच सर्वसामान्य जनतेच्या जखमांबर मीठ चोळणाऱ्या अहंभावी शहाजोगपणाचे किंकर्तव्यमूढ सल्ले देणाऱ्या पोस्ट टाकत उताणे पडायचे ही सध्या आमच्या गुरुजनांची दिनचर्या आहे. ते म्हणतील सध्या सुट्याच तर आहेत . कोरोना आहे. लॉकडाऊन आहे. आम्ही तरी काय करायचे? सध्या नियमातल्या उन्हाळी सुट्या आहेत मान्य, पण मागचं अख्खं वर्ष सुट्याच होत्या ना. पुढेही काय वाढवून ठेवलय माहिती नाही. आता तर सरकारने कोबिड युध्दभूमीवरुनही मास्तरांना रजा दिलीय. तसेही ते असून अडचणच होते. काही सन्माननीय अपवाद वगळता १०८ शिक्षक ‘योध्दा’ कामातही अळमटळम आणि हलगुर्जीपणाच करीत होते. म्हणूनच सरकारने मास्तरांवरचे कोरोना योद्ध्याचे खोगीर काढून घेतले. मास्तरांनाही तेच हवे होते. सुंठेवाचून खोकला गेला. त्यांचा सगळा खटाटोप पगार वाचवण्यासाठी आणि कपात टाळण्यासाठी होता. ते साधले. मग योद्धे पसार, याचा आता आम्ही तरी काय आणि कोणत्या शब्दात निषेध करावा. रणभूमीतून पसार बाजार बुणग्यांकडून काय अपेक्षा करावी. पण त्यांनी शिल्लक असलेली थोडीशी लाज बाळगावी ही किमान अपेक्षा आहे. कोरोनामुळे शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे काय बाटोळे झालेय या चिंतपेक्षा यांना चिंता आहे महागाई भत्ता आणि अधिकच्या कामाच्या अतिरिक्त वाढीव पगाराची.त्यासाठी है पायपीटी करतात. शिक्षकांच्या तशा अनेक संघटना आहेत. शासनाने म्हटले की गुरुजन शिक्षकाची बेतन निश्चिती विद्याथ्र्यांच्या गुणवत्तेवर ठरेल. तर सगळ्याच शिक्षक संघटना त्यावर तुटून पडल्या का बुआ ? शिक्षकाचे काम काय आहे? परीट घडीचे कपडे घालून गाड्या उडवणे ? ऐय्याशी करणे. प्रॉपर्टी खरेदी करणे, बँक बॅलन्स साठवणे, शाळांना दांड्या मारणे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची बाट लावणे, आणि पुन्हा निर्लज्जपणे पानतंबाखुच्या पिचकाऱ्या मारत खिदळत हिंडणे. यासाठी द्यायची का बेतनवाढ सगळा पगार, महागाई भत्ता बाढीव मानधन. आता तर सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करण्याची मागणी केली आहे. शिक्षक त्यात सामील आहेत. इकडे तरुण सुशिक्षित बेकारांच्या दोन पिझ्या बरबाद होत आल्यात. उच्च शिक्षित तरुणांना क्षमता गुणवत्ता असून नोकल्या नाहीत आणि यांना आणखी दोन वर्ष वाढवून हवे आहेत कशासाठी? पगारासाठीच ना! समाजासाठी तर सगळे करून झाले असावे एव्हाना. की अजून काही दिव्यत्वाची प्रचिती बाकी आहे? आहे तर मग तुमचा परफॉर्मस बर विश्वास का नाही? हे काही खरे सांगणार नाहीत. सत्य मान्य करणार नाहीत, वास्तव स्वीकारणार नाहीत. सरकारने या धब्बोटांना अजीबात भीक घालू नये, नोकरशाहीतली ही अडगळ जितकी लवकर निघेल तितकी बरी पाणी वाहते राहिले पाहिजे. त्यासाठी हे मोरीतले बोळे काढावेच लागतील. हीच आमची रास्त भूमिका आहे. खरे बोलल्याचा सख्ख्या आईलाही राग येतो. मास्तरांना आला तर आला.